ZIM vs SL : श्रीलंकेला विजयानतंर मोठा झटका, आयसीसीकडून अशी कारवाई

Zimbabwe vs Sri Lanka 1st Odi : झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा 29 ऑगस्टला झाला. श्रीलंकेने या सामन्यात विजय मिळवला. मात्र आयसीसीने काही तासानंतर श्रीलंकेवर दंडात्मक कारवाई केली.

ZIM vs SL : श्रीलंकेला विजयानतंर मोठा झटका, आयसीसीकडून अशी कारवाई
Sri Lanka Odi Team
Image Credit source: Icc X account
| Updated on: Sep 01, 2025 | 5:04 PM

चरित असलंका याच्या नेतृ्त्वात श्रीलंकेने झिंबाब्वे दौऱ्यात अप्रतिम सुरुवात केली. श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेतील सलग दोन्ही सामने जिंकत झिंबाब्वेला 2-0 ने क्लिन स्वीप केलं. श्रीलंकेने सलामीच्या सामन्यात 29 ऑगस्टला झिंबाब्वेवर शेवटच्या षटकात 7 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर 31 ऑगस्टला श्रीलंकेने 5 विकेट्सने विजय मिळवत मालिका एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली. मात्र आयसीसीने दुसऱ्या सामन्यादरम्यान श्रीलंकेवर कारवाई केली.

आयसीसीने श्रीलंकेवर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई केली आहे. श्रीलंका क्रिकेट टीमकडून पहिल्या सामन्यात ओव्हर रेटचं उल्लंघन झालं. त्यामुळे आयसीसीने श्रीलंकेच्या खेळाडूं दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे या खेळाडूंना एका सामन्याच्या एकूण मानधनापैकी 5 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावा लागणार आहे. आयसीसीचे सामनाधिकारी जेफ क्रो यांनी ही शिक्षा सुनावली आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

श्रीलंका टीम निर्धारित वेळेत 1 ओव्हर टाकण्यात अपयशी ठरली. श्रीलंकेकडून आयसीसी आचार संहितेच्या अनुच्छेद 2.22 चं उल्लंघन झालं. अनुच्छेद 2.22 मध्ये संबंधित टीम निर्धारित वेळेत षटकं टाकण्यास अपयशी ठरल्यास प्रत्येक खेळाडूवर प्रत्येक ओव्हरसाठी सामन्याच्या एकूण मानधनापैकी 5 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्याची तरदूत आहे. श्रीलंका 1 ओव्हर निर्धारित वेळेत टाकण्यात अपयशी ठरली. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंना 5 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.

श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका याने आपल्याकडून चूक झाल्याचं मान्य केलं. त्यामुळे या प्रकरणात औपचारिक सुनावणी करण्याची गरज पडली नाही. तसेच चरिथ असलंका याने नियमानुसार असलेली शिक्षा मान्य केली.

पहिल्या सामन्यातील शेवटच्या ओव्हरचा थरार

श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मधुशंका याने झिंबाब्वे विरूद्धच्या पहिल्या सामन्यातील शेवटच्या षटकातील पहिल्या 3 चेंडूवर सलग 3 विकेट्स घेत हॅटट्रिक घेतली. श्रीलंकेने अशाप्रकारे हा सामना 7 धावांनी जिंकला होता. त्यानंतर श्रीलंकेने 31 ऑगस्टला दुसर्‍या सामन्यासह मालिका जिंकली. श्रीलंकेने अशाप्रकारे 2019 नंतर विदेशात पहिलीवहिली एकदिवसीय मालिका जिंकली.

वनडेनंतर रंगणार टी 20I मालिकेचा थरार

दरम्यान आता झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 सप्टेंबरपासून टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत एकूण सामने होणार आहेत.  दुसरा सामना 6 सप्टेंबरला होणार आहे. तर अंतिम सामन्याचं आयोजन हे 7 सप्टेंबरला करण्यात आलं आहे.  हे तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स कल्बमध्ये होणार आहेत.