ICC T20 World Cup| सामना, सिरीज सगळंच गमावलं, पण ऋषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव, ‘थम्सअप’ चं बलिदान सोशल मीडियावर चर्चेत!

| Updated on: Nov 11, 2022 | 11:30 AM

हार्दिकनेही ऋषभ पंतचं बलिदान व्यर्थ घालवलं नाही. पुढच्याच बॉलला त्याने जोरदार सिक्स ठोकला.

ICC T20 World Cup| सामना, सिरीज सगळंच गमावलं, पण ऋषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव, थम्सअप चं बलिदान सोशल मीडियावर चर्चेत!
Image Credit source: social media
Follow us on

Rishabh Pant Sacrifice his Wicket| भारतीय क्रिकेट टीम टी 20 वर्ल्ड कपच्या (ICC T20 World Cup 2022) सेमी फायनलमध्ये भारताचा (India Semi Final) दारुण पराभव झाला. गुरुवारी एडिलेड येथे झालेल्या सामान्यात दुसऱ्या सेमी फायनल मॅचमध्ये इंग्लंडने भारतावर 10 विकेट्सनी (10 Wickets) विजय मिळवला. रोहित शर्माच्या कॅप्टनशिपमध्ये भारताचा पराभव झाला. भारतातले कोट्यवधी क्रिकेटप्रेमी दुखावलेत. पण या लढाईत ऋषभ पंतने दिलेले योगदान सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

भारताचा धुरंधर ऑलराऊंडर हार्दिक पांड्यासाठी ऋषभ पंतने दिलेलं योगदान क्रिकेटप्रेमींमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरलंय. पंतने या मॅचमध्ये 4 बॉलवर एक चौका मारत एकूण 6रन्स काढले.

ऋषभ पंतचं बलिदान समजून घ्यायचं असेल तर मॅचची स्थिती काय होती ते पाहुयात. एडिलेड ओव्हल मैदानावर जोस बटलरने टॉस जिंकलं. भारताला पहिल्यांदा बॅटिंग करण्यास बोलावण्यात आलं.

भारतीय टीमने 20 ओव्हेरमध्ये 6 विकेटवर 168 रन्स काढले. दोन बॅट्समननी अर्धशतक काढलं. हार्दिक पांड्याने 33 बॉलमध्ये 63 तर विराट कोहलीने 40० बॉलमध्ये 50 रन्सचं योगदान दिलं.

वेळ होती शेवटच्या ओव्हरची. तिसऱ्या बॉलवर ऋषभ पंत बॅटिंग करत होता. क्रिस जॉर्डनचा यॉर्कर आला. ऋषभ पंतने बॅटने तो टोलवण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पांड्याला रन काढायचा होता. तो क्रीज सोडून स्ट्राइकर्स एंडकडे पळाला.

जोस बटलरने हीच वेळ साधली. जॉर्डनच्या बाजूने बॉल भिरकावला. पंतने मनात आणलं असतं तर त्याने स्ट्राइकर्स एंड सोडला नसता. पण त्याने हार्दिक पांड्याकडे पाहून थम्स अपचा इशारा केला. तो रन आऊट झाला आणि पव्हेलियनच्या दिशेने निघून गेला.

मॅचमध्ये ऋषभ पंतचं योगदान तसं काहीच नव्हतं. पण सोशल मीडियावर ऋषभ पंतच्या चाहत्यांनी हे बलिदान उचलून धरलंय. लोकांनी वेगवेगळ्या मीम्स तयार केल्यात.

एकाने मिर्झापूर सीरीजवरून मीम शेअर केली. त्यावर लिहिलंय- आमच्या मनात तुझ्याविषयीचा आदर आता आणखीच वाढलाय. तर एका यूझरने लिहिलंय- पंतने हार्दिक पांड्यासाठी विकेटचं बलिदान दिलं. त्याच्या या कृतीला सलाम!