AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीत खदखद वाढली! राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून शरद पवार यांच्याकडे पार्थ पवार यांची तक्रार

राष्ट्रवादीत खदखद वाढली! राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून शरद पवार यांच्याकडे पार्थ पवार यांची तक्रार

| Updated on: May 16, 2026 | 9:53 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, पक्षातील एका बड्या नेत्याने थेट शरद पवार यांच्याकडे पार्थ पवार यांच्याविरोधात तक्रार केल्याची माहिती tv9marathi ला सूत्रांनी दिली आहे. या घडामोडींमुळे अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष आता थेट पवार कुटुंबाच्या ‘कोर्टात’ पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, पक्षातील एका बड्या नेत्याने थेट शरद पवार यांच्याकडे पार्थ पवार यांच्याविरोधात तक्रार केल्याची माहिती tv9marathi ला सूत्रांनी दिली आहे. या घडामोडींमुळे अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष आता थेट पवार कुटुंबाच्या ‘कोर्टात’ पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित नेत्याने शरद पवार यांची भेट घेत पार्थ पवार यांना “कुटुंब प्रमुख म्हणून समज द्यावी” अशी मागणी केली आहे. “आम्ही देखील पक्षासाठी अनेक वर्षे अहोरात्र मेहनत घेतली आहे. अजित दादा असताना अशा प्रकारच्या घटना कधी घडल्या नाहीत,” अशी नाराजी या नेत्याने शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
तसेच, पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा मान-सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भूमिकाही संबंधित नेत्याने मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक आणि नेतृत्व पातळीवर विविध घडामोडी सुरू आहेत. त्यातच आता पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत थेट शरद पवारांकडे तक्रार पोहोचल्याने पक्षातील अंतर्गत नाराजी उघड होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसली तरी, राष्ट्रवादीतील वाढत्या अंतर्गत संघर्षामुळे आगामी काळात पक्षातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Published on: May 16, 2026 09:53 AM
Follow Us