AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप विषारी असतो कारण…, त्याच्याकडून देखील शिकण्यासारखं खूप काही…, चाणाक्य नीतिमध्ये दडलंय याचं उत्तर

साप विषारी असतात, सर्वांना माहिती आहे. पण सर्वच साप विषारी नसतात, काही साप विषारी नसताना देखील त्यांना विषारी असल्याचं दाखवावं लागतं... तर माणसाला सापाकडून शिकण्यासारखं खूप काही आाहे... याचं उत्तर चाणाक्य नीतिमध्ये दडलेलं आहे...

साप विषारी असतो कारण..., त्याच्याकडून देखील शिकण्यासारखं खूप काही..., चाणाक्य नीतिमध्ये दडलंय याचं उत्तर
| Updated on: May 16, 2026 | 10:12 AM
Share

Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांनी अनेक आयुष्यात घडणाऱ्या अनेक कठीण गोष्टी सोप्या करून सांगितल्या आहे. ज्यामुळे आजही त्यांची शिकवण मार्गदर्शक ठरत आहे. चाणाक्य यांनी अनेक श्लोक देखील लिहिले आहेत. चाणाक्या यांनी चाणाक्य नीतिमध्ये कोणती गोष्टीतून कोणती शिकवण घ्यावी, हे सुद्धा सांगितलं आहे. तर सापाकडून देखील शिकण्यासारखं खूप काही आहे… असं चाणाक्य नीतिमध्ये सांगितलं आहे…

जरी साप विषारी नसेल तरी, त्याला विषारी दिसावं लागतं… – आचार्य चाणक्य

आचार्य असं का म्हणाले असतील, असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. चाणक्य म्हणतात, साप विषारी नसेल तरी, त्याला विषारी दिसावं लागतं…. व्यावहारिक जिवनात याचा अर्थ फार खोल आहे… आचार्य म्हणतात, या जगात वावरताना अतिशय साधं – सरळ असून देखील चालत नाही. असा स्वभाव कधीतरी स्वतःसाठी घातक ठरु शकतो… ज्याप्रमाणे जंगलात सरळ असलेल्या झाडांना आधी तोडलं जातं, त्याचप्रमाणे, साध्या आणि कमकुवत लोकांच्या स्वभावाचा फायदा घेतला जातो.

विषारी दिसण्याचा खरा अर्थ…

याठिकाणी विषारी दिसण्याचा अर्थ असा बिलकूल नाही की, दुसऱ्यांना नुकसान पोहोचवणं, दुसऱ्यासोबत वाईट व्यवहार करणं किंवा समाजात द्वेष निर्माण करणं… याचा अर्थ असा होती की, स्वतः भोवती एक चौकट आखून घ्यायची आणि कायम आपल्या आत्मसन्माची रक्षा करायची. याचा अर्थ असा की, तुमच्यामध्ये इतका दृढनिश्चय आणि आत्मसन्मान असला पाहिजे की, तुम्हाला कमकुवत समजून कोणीही तुम्हाला दडपून टाकण्याचा किंवा तुमचा वापर करण्याचे धाडस करू शकणार नाही.

व्यावहारिक जीवनात आणि कामाच्या ठिकाणी महत्त्व

आजच्या जगात, मग ते कामाचं ठिकाण असो किंवा सामाजिक संबंध, जर तुम्ही प्रत्येक चुकीची गोष्ट कोणताही विरोध न करता सहन केली, तर लोक तुमच्या सभ्यतेला कमजोरी समजतील. अंतर्मनात शांत आणि दयाळू असणं हा एक उत्तम गुण आहे, पण बाहेरून स्वतःला कणखर आणि निर्भय दाखवणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमचा मुद्दा ठामपणे मांडता आला पाहिजे आणि गरज असेल तेव्हा ‘नाही’ म्हणता आलं पाहिजे.

सर्वात शेवटी, चाणक्य स्पष्ट करतात की, तुम्ही आतून कितीही सौम्य स्वभावाचे असलात तरी, स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी शक्तीचं प्रदर्शन करणं आवश्यक असतं. जेव्हा तुम्ही बाहेरून एक कणखर आणि खंबीर प्रतिमा जपता, तेव्हा वाईट हेतू असलेले लोक आपोआप तुमच्यापासून दूर जातात. निर्भयतेचे आणि आत्मसन्मानाचे हे प्रदर्शनच समाजात तुमच्या सन्मानाची आणि सुरक्षिततेची खरी ढाल बनते.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...