AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : पार्थ पवारांना समज द्या, अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी, संघर्ष वाढल्याने विषय थेट शरद पवारांच्या कोर्टात

Sharad Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या चार महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष, कुरबुरी सुरु झाल्या आहेत. हा सगळा विषय आता शरद पवार यांच्या कोर्टात गेला आहे. प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनिल तटकरे या तीन नेत्यांची नाव चर्चेत आहे.

Sharad Pawar : पार्थ पवारांना समज द्या, अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी, संघर्ष वाढल्याने विषय थेट शरद पवारांच्या कोर्टात
Parth Pawar-Sharad Pawar
| Updated on: May 16, 2026 | 10:03 AM
Share

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा आहे. सुनेत्रा पवार गट आणि शरद पवार गट. सुनेत्रा पवार गट हा अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पण अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर येत आहे. अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या चार महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. कारण पक्षाकडून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात अनेक नेत्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नाहीय. केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नाहीय.

या यादीत सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख आहे. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांची जनरल सेक्रेटरी म्हणून नोंद करण्यात आली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनिल तटकरे यांची नावं प्रमुख पदांमध्ये नसल्याने उलट-सुलट राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातूंग यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. पण सुनिल तटकरे यांच्या बाबतीत असं घडलेलं नाही.

दादा असताना असं काही घडत नव्हतं

दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्याने पार्थ पवार यांची शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे. शरद पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी अशी बड्या नेत्याने शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. आम्ही सुद्धा पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. दादा असताना असं काही घडत नव्हतं, असं या नेत्याने पवारांकडे मत मांडलं. आमचा मान सन्मान राखला पाहिजे असं आम्हाला वाटतय, असं या बड्या नेत्याने पवारांना सांगितलं.

सुनील तटकरे शरद पवारांना का भेटलेले?

आता हा बडा नेता कोण ते अजून समोर आलेलं नाही. पण नुकतीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची सिलव्हर ओक निवासस्थानी भेट घेतली होती. अनेक वर्षांनी सुनील तटकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. ही भेट राजकीय नव्हती, शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटलो असं सुनील तटकरे यांनी सांगितलं होतं.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?

दरम्यान दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पुण्यात बैठक पार पडली. आता मुंबईत बैठक बोलवण्यात आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसना एकत्र यायचं असेल तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला भाजपं विरोधी भूमिका घ्यावी लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?