AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीत अंतर्गत वाद? तटकरे-पटेल यांचा पत्ता कट? निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर

NCP : राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. बड्या नेत्यांच्या नावापुढे त्यांच्या पदांचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

राष्ट्रवादीत अंतर्गत वाद? तटकरे-पटेल यांचा पत्ता कट? निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर
Patel and TatkareImage Credit source: Google
| Updated on: May 15, 2026 | 7:46 PM
Share

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. काही नेत्यांमध्ये आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण पक्षाकडून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात अनेक नेत्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सुनील तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नाही

केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे पक्षात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. 29 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी पाठवली होती. या यादीत सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नाव नमूद करण्यात आले आहे. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांची जनरल सेक्रेटरी म्हणून नोंद करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय?

निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या या पत्रात पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनिल तटकरे यांची नावे प्रमुख पदांमध्ये नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातूंग यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे, मात्र सुनिल तटकरे यांच्या नावासमोर हे पद नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे पक्षात त्यांना जाणीवपूर्वक बाजूला केले जात आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

काय म्हणाले मुश्रीफ

याबाबत बोलताना हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, आमच्या केंद्राच्या ऑफिस बेररमध्ये सुनील तटकरे यांचं नाव आहे त्यामुळे आजही ते प्रदेशाध्यक्ष आहेत. ते पत्र आहे ते राष्ट्रीय कार्यकारणी बाबत आहे असं विधान केलं आहे. दरम्यान, याआधी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत सुनेत्रा पवार यांच्यात नाराजी असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पत्रात तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नाही, त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?