AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक, पुण्यातील..

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सांगण्यात आले की, अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत सकारात्मक होते. यादरम्यानच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक, पुण्यातील..
Sharad Pawar and Sunetra Pawar
| Updated on: May 15, 2026 | 11:20 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सुत्रे सुनेत्रा पवार यांनी आपल्या हाती घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती असा खुलासा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला होता. रोहित पवार देखील याबाबत अनेकदा बोलताना दिसले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडून अशी कोणतीही चर्चा सुरू नव्हती, असे स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सतत चर्चा पुढे येते. मात्र, यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काहीच भाष्य केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सातत्याने दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाबाबत भाष्य केले जाते. यादरम्यानच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. यासंदर्भातील एक गुप्त बैठकही पार पडली.

शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात गुप्त बैठक पार पडली. या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित होते. हेच नाही तर विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, शरद पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम उपस्थित उपस्थित होते.

काही काळ ही बैठक सुरू होती. ही बैठक पक्षाच्या कार्यालयात झाली नाही तर एका हॉटेलमध्ये पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर बैठकीत महत्त्वपूर्ण आहे. हेच नाही तर सुनील तटकरे यांनीही दोन दिवसांपूर्वी अचानक शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिक काळानंतर सुनील तटकरे शरद पवार यांच्या भेटीकरिता पोहोचले होते.

सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरिता मी आलो होतो. पुण्यात पार पडलेल्या या गुप्त बैठकीत सुनील तटकरे आणि शरद पवार यांच्या भेटीबाबतही चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती माहिती मिळत आहे. या बैठकीनंतरचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता दोन्ही पक्ष एकत्र येणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Follow Us
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल