AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Man: गळ्यात सोन्याच्या साखळ्या, हातात जाडजूड कडे, रामकथेत घालून आला 6.3 किलो सोने, तो ‘गोल्डन मॅन’ कोण?

Golden Man in Ram Katha: श्रीराम कथा ऐकण्यासाठी एक गोल्डन मॅन आल्याने मंडपात त्याचीच चर्चा सुरू झाली. या गोल्डनमॅनच्या अंगावर 10 कोटी रुपयांचे 6.3 किलो वजनाचे सोने होते.

Gold Man: गळ्यात सोन्याच्या साखळ्या, हातात जाडजूड कडे, रामकथेत घालून आला 6.3 किलो सोने, तो 'गोल्डन मॅन' कोण?
रामकथेत घालून आला 6.3 किलो सोने, तो 'गोल्डन मॅन' कोण?
| Updated on: Nov 20, 2026 | 11:58 AM
Share

Golden Man in Ram Katha: उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधील कुंडा येथे आयोजित श्रीराम कथेत गोल्डन मॅनचीच चर्चा होती. राजा भैय्या यांची राम कथा ऐकण्यासाठी हा गोल्डन मॅन आला होता. त्याच्या अंगावर तब्बल 10 कोटी रुपयांचे 6.3 किलो वजनाचे सोने होते. आपल्या खास लूकने या सोनेरी माणसाने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली. धार्मिक कार्यक्रमात असे श्रीमंतीचे प्रदर्शन कशासाठी असा सवालही काहींनी केला. राम कथा ऐकण्यासाठी आले होते की सोन्याच्या, श्रीमंतीच्या प्रदर्शनासाठी अशी कुजबुज उपस्थितांमध्ये दिसून आली.

गोल्डन मॅन कोण?

कुंडा येथील राजा भैय्या यांच्या राम कथेत गोल्डन मॅन आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला. गळ्यात सोन्याच्या जाड साखळ्या, हातात कडे आणि गळ्याभोवती सोन्याच्या माळांनी प्रेम कुमार सिंह यांनी सर्वांचे लक्ष वेधले. सोन्याच्या साखळ्या घालून आलेला हा माणूस कोण याची सगळ्यांना उत्सुकता लागली. कथावेळी त्यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी लोकांची गर्दी झाली. बिहार येथून कुंडामध्ये आलेल्या प्रेम कुमार सिंह हे चर्चेत होते. तर काहींना या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.

कोण आहेत प्रेम कुमार सिंह?

प्रेम कुमार सिंह हे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील बासदेवपूर येथील रहिवाशी आहेत. ते शेतकरी आणि सरकारी कंत्राटदार आहेत. सोने खरेदी करणे आणि ते अंगावर घालणे त्यांना आवडते. त्यांची गोल्डमॅन ऑफ बिहार अशी ओळख आहे. त्यांच्याकडे अनेक सोन्याचे चेन, अंगठ्या, कडे आणि हनुमानाचे एक विशेष लॉकेट आहे. त्यांच्याकडे 24 कॅरेट सोन्याचा मुलामा लावलेली बुलेटही असल्याचे सांगितले जाते.

17 वर्षांपासून सोन्याचा छंद

गेल्या सतरा वर्षांपासून प्रेम सिंह यांना सोने खरेदीचा छंद लागला आहे. वयाच्या तिशीत त्यांनी सोने खरेदी आणि गळ्यात सोन्याची साखळी घालायला सुरूवात केली. ते सार्वजनिक ठिकाणी सोने घालून वावरू लागले. हळूहळू त्यांच्यात गळ्यात आणि हातात सोन्याचा पसारा वाढला. त्यांच्याकडे सोन्याच्या 38 चेन आहेत. तर सोन्याच्या 10 अंगठ्या आहेत. त्यांच्या हातात 3 सोन्याची कडे आहेत. त्यांच्याकडे सोन्याचा मुलामा लावलेली एक बुलेट आहे. त्यांना गोल्ड मॅन ऑफ बिहार असे ओळखले जाते.

Follow Us
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता वार्षिक...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद, थेट न्यायालयात..
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद कायम, थेट न्यायालयात याचिका दाखल