AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Epstein Files : कुठल्या कायद्याखाली याचिका करावी हेच वकिलांना माहीत नाही…, महाराष्ट्र एपस्टीन फाईल’च्या निर्मात्याचा आरोप

Maharashtra Epstein Files : सिनेमाच्या नावाला आक्षेप घेत छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आता, 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल' सिनेमाचे निर्माते सचिन रोडे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Epstein Files : कुठल्या कायद्याखाली याचिका करावी हेच वकिलांना माहीत नाही..., महाराष्ट्र एपस्टीन फाईल'च्या निर्मात्याचा आरोप
Maharashtra Epstein Files
| Updated on: Nov 20, 2026 | 12:07 PM
Share

Maharashtra Epstein Files : अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांची मुख्य भूमिका असलेला ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमा आज म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण सतत होत असलेल्या विरोधामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकल्यात आली आहे. पण नक्की कधी सिनेमा प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीच जाहिर घोषणा करण्यात आलेली नाही. सांगायचं झालं तर, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या नावावर आक्षेप घेत नाव बदलेपर्यंत सिनेमाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर, हे वाद आता कोर्टात देखील पोहोचले असून नवे वाद निर्माण झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या नावाला आक्षेप घेत छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आता, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स‘ सिनेमाचे निर्माते सचिन रोडे पाटील यांनी वकिलांवर निशाणा साधत, कुठल्या कायद्याखाली याचिका करावी हेच वकिलांना माहीत नाही… असं ते स्पष्ट म्हणाले आहे.

सचिन रोडे पाटील संताप व्यक्त करत म्हणाले, ‘न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आली आहे, ती अतिशय चुकीची आहे. दाखल करण्यात आलेली याचिका पाहिल्यानंतर असं वाटत आहे की, याचिकाकर्ता यांच्या वकिलांना कायद्याचं फारशी माहिली नसावी. कुठल्या कायद्यांतर्गत याचिका दाखल करावी याचंही नॉलेज त्यांना नाही…’

सचिन रोडे पाटील पुढे म्हणाले, ‘कोणत्या न कोणत्या कारणामुळे सिनेमा कसा थांबवता येईल, यासाठीच अनेक जण प्रयत्न करत आहेत. नवख्या वकिलाला उभा करून त्यांनी स्वतःचा हसा करून घेतला आहे. कुठेही सिनेमा थांबवायला आम्हाला हायकोर्टाने सांगितलं नाही. सिनेमाला न्यायालयाने कुठेही थांबवलं नाही.’, सध्या सचिन यांचं वक्तव्य चर्चेत आहे.

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या नावामुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

समोर आलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी सिनेमाच्या नावावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. या सिनेमाचं नाव महाराष्ट्राच्या प्रतिमेला आणि 12 कोटी जनतेच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. . संभाजी ब्रिगेड, मराठा विकास मंच, हिंदू सेवा संघ यांनी सिनेमाचं नाव न बदलल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता वार्षिक...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद, थेट न्यायालयात..
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद कायम, थेट न्यायालयात याचिका दाखल