USA vs CAN: निकोलस कर्टन-नवनीत धालीवाल जोडीची अर्धशतकी खेळी, यूएसएसमोर 195 धावांचं आव्हान

Navneet Dhaliwal- Nicholas Kirton Fifty: कॅनडाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान यूएस विरुद्ध तोडफोड बॅटिंग करत 194 धावा केल्या.

USA vs CAN: निकोलस कर्टन-नवनीत धालीवाल जोडीची अर्धशतकी खेळी, यूएसएसमोर 195 धावांचं आव्हान
Navneet Dhaliwal and Nicholas Kirton fifty
| Updated on: Jun 02, 2024 | 8:20 AM

कॅनडा क्रिकेट टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्या साामन्यात यूएसए विरुद्ध झंझावाती बॅटिंग करत 190 पार मजल मारली आहे. कॅनडाने यजमान यूएसएला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं आहे. कॅनडाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 194 धावा ठोकल्या. कॅनडाकडून नवनीत धालीवाल आणि निकोलस कर्टन या जोडीने अर्धशतकी खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे कॅनडाला 180 पार पोहचता आलं.कॅनडाच्या फलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली. आता कॅनडाचे गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करतात, की यूएसएचे फलंदाज विस्फोटक बॅटिंग करत घरच्या मैदानात वर्ल्ड कपमध्ये विजयाने सुरुवात करतात? हे थोड्या वेळात स्पष्ट होईल.

कॅनडाकडून एकूण 7 फलंदाजांनी बॅटिंग केली. त्यापैकी प्रगत सिंह याचा अपवाद वगळता सर्वांनी मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा करुन घेतला. प्रगत सिंह 7 बॉलमध्ये 5 धावा करुन आऊट झाला. तर डिलन हेलिगर 1 धावेवर नाबाद परतला. कॅनडासाठी श्रेयस मोव्वा याने अखेरच्या क्षणी तडाखेदार बॅटिंग करत टीमचा स्कोअर 190 पार पोहचवला. श्रेयसने 16 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह 200 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊ 32 रन्स केल्या. तर एरोन जॉन्सनने 23 धावांचं योगदान दिलं. दिलप्रीत सिंहने 11 धावा केल्या.

कॅनडासाठी नवनीत धालीवाल आणि निकोलस कर्टन या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. नवनीतने 44 बॉलमध्ये 6 फोर आणि 3 सिक्ससह 61 धावांची खेळी केली. नवनीत या नवव्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. नवनीतनंतर निकोलस कर्टन याने अर्धशतक झळकावलं. निकोलसने 31 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. यूएसएकडून कॉरी एंडरसन, हरमीत सिंह आणि अली खान या तिघांनी 1-1 विकेट घेतली.

यूएसए 195  चेस करणार?

यूएसए प्लेईंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, अली खान आणि सौरभ नेत्रवाळकर.

कॅनडा प्लेइंग ईलेव्हन: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), दिलप्रीत सिंग, निखिल दत्ता, डिलन हेलिगर, कलीम साना आणि जेरेमी गॉर्डन.