SAW vs IND : राधा यादवची 1 चूक नडली, मारिजान कापची विजयी खेळी, टीम इंडियाचा पहिला पराभव

South Africa Women vs India Women Match Result : वुमन्स टीम इंडियाने मँचेस्टरमधील या स्टेडियमध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान सुरक्षितपणे पूर्ण करत विजय मिळवला.

SAW vs IND : राधा यादवची 1 चूक नडली, मारिजान कापची विजयी खेळी, टीम इंडियाचा पहिला पराभव
Radha Yadav and Marizanne Kapp
Image Credit source: Social Media and Icc X Account
| Updated on: Jun 21, 2026 | 11:11 PM

आयसीसी टी 20i वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 18 व्या सामन्याचा निकाल लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर करो या मरो सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 5 बॉलआधी आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. दक्षिण आफिकेने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे दुसरा विजय मिळवला.मारिजान काप ही दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची शिल्पकार ठरली. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे सेमी फायनलमधील आव्हान कायम ठेवलं आहे. तर भारताचा हा सलग 2 विजयानंतर पहिला पराभव ठरला. मारिजान काप हीने केलेल्या नाबाद खेळीसाठी तिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारने गौरवण्यात आलं.

सामन्यात काय झालं?

टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारत दक्षिण आफ्रिकेसमोर आणखी काही धावा जोडण्यात अपयशी ठरली. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. भारतासाठी शफाली वर्मा हीने सर्वाधिक 31 धावा केल्या. दीप्ती शर्मा हीने 29 आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने 24 धावा जोडल्या. तर इतरांना 20 हा आकडाही गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी मारिजान काप आणि शबनिम इस्माईल या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग

कॅप्टन लॉरा वॉल्वॉर्ड्ट आणि ताझिमन ब्रिट्स या दोघींनी सावध सुरुवात केली. मात्र श्री चरणी हीने दक्षिण आफ्रिकेला डावातील 6 व्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले. श्रीने लॉरा आणि ए डीकसन या दोघींनी आऊट केलं. टीम इंडियाने यासह कमबॅक केलं. मात्र मारिजान काप आणि ताझिमन ब्रिट्स या दोघींनी 63 बॉलमध्ये 97 रन्सची पार्टनरशीप करुन दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. त्यामुळे सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकला होता. मात्र शफाली वर्मा हीने ताझमिनला आऊट करत भारताला कमबॅक करुन दिलं.

श्री चरणी हीने नॅडीन डी क्लार्कला 5 रन्सवर बोल्ड केलं. भारताने अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला चौथा झटका दिला. मात्र त्यानंतर मारिजानने क्लो ट्रायन हीच्या सोबतीने दक्षिण आफ्रिकेला विजयी केलं. मारिजानने 45 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 7 फोरसह नॉट आऊट 81 रन्स केल्या. तर क्लोने नाबाद 10 धावा केल्या. टीम इंडियासाठी श्री चरणी हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शफालीने 1 विकेट मिळवली.

राधा यादवची घोडचूक

या दरम्यान राधा ठाकुर हीने सर्वात मोठी चूक केली. राधाने सेट बॅट्समन मारिजान काप हीचा 65 धावांवर सोपा कॅच सोडला. भारताला ही चूक महागात पडली. राधाने कापचा कॅच सोडणं भारताला महागात पडलं. राधाने कॅच घेतला असता तर सामन्याचा निकाल वेगळा असता, असं चाहत्यांकडून म्हटलं जात आहे.

Follow Us