आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये यशस्वी जयस्वाल याचा धमाका, तर रोहित शर्माची टॉप 10 मध्ये एन्ट्री

Icc Test Ranking | टीम इंडियाच्या खेळाडूंना वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर मोठा फायदा झाला आहे. अनेक खेळाडूंनी रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये यशस्वी जयस्वाल याचा धमाका, तर रोहित शर्माची टॉप 10 मध्ये एन्ट्री
| Updated on: Jul 26, 2023 | 7:02 PM

मुंबई | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. पहिला सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली. तर दुसऱ्या कसोटीतील पाचव्या दिवसाचा खेळ हा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे टीम इंडियाला असलेली विजयाची संधी पावसाने हिरावून घेतली. तर पावसाने विंडिजची लाज राखली. पावसामुळे विंडिजला व्हॉईटवॉश देण्याची संधी हुकली. या कसोटी मालिकेत मुंबईकर खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली. कॅप्टन रोहित शर्मा आणि ओपनर यशस्वी जयस्वाल या दोघांना आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे.

आयसीसीने टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये यशस्वीला बॅटिंग रँकिंगमध्ये मोठी झेप घेण्यात यश आलंय. यशस्वीने आपल्या पहिल्याच कसोटी आणि आंतरराष्ट्रीय मालिकेत धमाका केला. यशस्वीने रँकिंगमध्ये थेट 11 स्थानांची लांब उडी घेतली. त्यामुळे यशस्वी थेट 74 वरुन 63 व्या क्रमांकावर पोहचला आहे. यशस्वीच्या नावावर 466 पॉइंट्स आहेत. यशस्वीने विंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 57 आणि दुसऱ्या डावात 38 धावांची खेळी केली.

रोहित शर्मा याचं काय?

रोहित शर्माने या रँकिंगमध्ये टॉप 10मध्ये एन्ट्री मारली आहे. रोहित शर्मा टॉप 10 मध्ये शेवटून दुसऱ्या अर्थात नवव्या क्रमांकावर आहे. रोहितच्या नावावर 759 पॉइंट्स आहेत. रोहितने दुसऱ्या कसोटीत 80 आणि 57 धावांची खेळी केली होती. ऋषभ पंत याला एका स्थानाचं नुकसान झालंय. पंतची 13 वरुन 12 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर विराच कोहली 14 व्या क्रमांकावर आहे.

टॉप 3 मध्ये कोण?

न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसन हा अव्वलस्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन दुसऱ्या आणि इंग्लंड टीमचा अनुभवी खेळाडू जो रुट तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टेस्ट बॉलिंग रँकिंगमध्ये टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन याने पहिला नंबर कायम राखलाय. तर रविंद्र जडेजा हा सहाव्या क्रमांकावर आहे. तर विंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटीत 5 विकेट्स घेणारा मोहम्मद सिराज हा 33 व्या स्थानी पोहचला आहे. तसेच ऑलराउंडर रँकिंगमध्ये रविंद्र जडेजा आणि आर अश्विन दोघे टॉप 2 मध्ये आहेत. तर अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us