U19 World Cup 2022: राज बावाचं तुफान, चार षटकात घेतल्या चार विकेट

| Updated on: Feb 05, 2022 | 9:53 PM

आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत सुरुवातीला भारताच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला धक्के दिले.

1 / 5
आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत सुरुवातीला भारताच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला धक्के दिले. रवी कुमारने प्रारंभीच्या षटकांमध्ये इंग्लंडच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं. रवीच्या धक्क्यांमधून इंग्लंडचा संघ सावरलेला नसतानाच, ऑलराऊंडर राज बावाने इंग्लंडचा कबंरड मोडलं. (Photo: Twitter/BCCI)

2 / 5
राज बावाने पहिल्या चार षटकांमध्ये चार विकेट घेतल्या व इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. इंग्लंडच्या टॉप आणि मीडर ऑर्डरला टिकूच दिलं नाही. (Photo: Twitter/BCCI)

3 / 5
राज बावाने त्याच्या चौथ्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर विकेट घेतल्या. राज बावाला हॅट्ट्रिक घेता आली नाही. पण लगेचच त्याने चौथा विकेटही घेतला. राज बावाने शॉर्ट पीच बॉल्सवर इंग्लंडच्या फलंदाजांना लक्ष्य केलं. त्यामुळे एकवेळ इंग्लंडची सहाबाद 61 अशी स्थिती होती. त्याआधी सुद्धा राज बावाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार विकेट घेतल्या होत्या. (Photo: Twitter/BCCI)

4 / 5
राज बावा फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजीही तितकीच दमदार करतो.

5 / 5
युगांडाविरोधात त्याने 108 चेंडूत 162 धावांची खेळी केली होती. यात चौदा चौकार आणि आठ षटकार लगावले. राज बावा अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत एकाडावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 2004 मधला स्कॉटलंड विरुद्ध 155 धावांचा शिखर धवनचा विक्रम मोडीत काढला होता.