Icc under 19 cricket world cup: सेंच्युरी, पाच विकेट घेणाऱ्या अक्रमचा हा ‘चक्रम’ करुन सोडणारा SIX नक्की पाहा VIDEO

| Updated on: Feb 04, 2022 | 2:43 PM

कासिमने त्याच्या खेळीत लगावेल्या एका षटकाराची बरीच चर्चा आहे. त्याने विचित्र पद्धतीने हा षटकार मारला.

Icc under 19 cricket world cup: सेंच्युरी, पाच विकेट घेणाऱ्या अक्रमचा हा चक्रम करुन सोडणारा SIX नक्की पाहा VIDEO
Follow us on

अँटिग्वा: अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत (icc under 19 cricket world cup) पाचव्या स्थानासाठी खेळल्या गेलेल्या प्लेऑफच्या सामन्यात पाकिस्तानच्या कासिम अक्रमने (qasim akram) काल एक खास विक्रम आपल्या नावावर केला. कासिमने पाकिस्तानसाठी शतक झळकवताना पाच विकेट घेतल्या. यूथ वनडे इंटरनॅशनलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. कासिमने श्रीलंकेविरुद्धच्या (Pakistan vs Srilanka) सामन्यात 80 चेंडूत 135 धावा तडकावल्या. त्यानंतर गोलंदाजीमध्येही त्याने श्रीलंकेला तडाखा दिला. 10 षटकात 37 धावा देत त्याने पाच विकेट घेतल्या. एक उत्तर ऑलराऊंडरचा खेळ त्याने दाखवला. वर्ल्डकपमधील पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघांचे आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. हा फक्त क्रमांक निश्चित करण्यासाठी खेळवण्यात आलेला सामना होता. भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये उद्या अंडर 19 वर्ल्डकपचा अंतिम सामना होणार आहे.

कासिमची फटेकबाजी
प्लेऑफच्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर 238 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 50 षटकात तीन विकेट गमावून 365 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 127 धावात आटोपला. पाकिस्तानकडून कॅप्टन कासिम अक्रम आणि हसीबुल्लाह खान यांनी शतकी खेळी केली. कासिमने 80 चेंडूत 135 धावा आणि हसीबुल्लाह खानने 151 चेंडूत 136 धावा केल्या.

कासिमने आपल्या खेळीत 13 चौकार आणि सहा षटकार लगावले. हसीबुल्लाह खानने नऊ चौकार आणि दोन षटकार लगावले. दुसरा सलामीवीर मोहम्मद शहजादने (73) अर्धशतकी खेळी केली. हसीबुल्लाह सोबत मिळून त्याने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पाकिस्तानने पहिल्या विकेटसाठी 134 धावांची आणि दुसऱ्या विकेटसाठी कासिम-हसीबुल्लाहने 229 धावांची भागीदारी केली. श्रीलंकेसमोर त्यांनी विजयासाठी 366 धावांचं विशाल लक्ष्य दिलं.

कासिमची जबरदस्त गोलंदाजी
कासिमच्या प्रभावी ऑफस्पिन गोलंदाजीसमोर श्रीलंकेने शरणागती पत्करली. 50 धावात श्रीलंकेने सहा विकेट गमावल्या होत्या. यात पाच विकेट एकट्या कासिम अक्रमच्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या विजयात कासिमने महत्त्वची भूमिका बजावली. श्रीलंकेकडून विनुज रनपालने अर्धशतक झळकावलं.

कासिमने त्याच्या खेळीत लगावेल्या एका षटकाराची बरीच चर्चा आहे. त्याने विचित्र पद्धतीने हा षटकार मारला.

संबंधित बातम्या:
Shaik Rasheed: कीटकनाशक विकणाऱ्याचा मुलगा आज अंडर 19 टीमचा स्टार, दत्तक घेऊन घडवलेल्या मुलाची गोष्ट
IND vs WI: आणखी एका स्फोटक फलंदाजाचा टीम इंडियात समावेश, एका षटकात भारताच्या बाजूने झुकवू शकतो सामना
IPL Auction आधीच बेबी एबीचा धमाका, डिविलियर्स सारखा खेळतो, सहा सामन्यात कुटल्या 506 धावा, मोडला भारतीयाचा वर्ल्ड रेकॉर्ड