Shaik Rasheed: कीटकनाशक विकणाऱ्याचा मुलगा आज अंडर 19 टीमचा स्टार, दत्तक घेऊन घडवलेल्या मुलाची गोष्ट

| Updated on: Feb 04, 2022 | 1:28 PM

परिस्थितीशी झुंज देऊन, संघर्ष करुन तो इथवर पोहोचलाय. यामध्ये त्याचे वडील बालिशा यांचे खूप मोठे योगदाने आहे. मुलाला यशस्वी क्रिकेटपटू बनवण्याची त्यांची धडपड, जिद्द, मेहनत यामुळेच आज हा दिवस पाहता आला.

Shaik Rasheed: कीटकनाशक विकणाऱ्याचा मुलगा आज अंडर 19 टीमचा स्टार, दत्तक घेऊन घडवलेल्या मुलाची गोष्ट
shaikh-Rasheed
Follow us on

ICC Under-19 World Cup: भारताच्या युवा संघाने अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत (Under 19 world cup Final) प्रवेश केला आहे. भारताच्या या अंडर 19 टीममधील बहुतांश मुलं ही सामान्य कुटुंबातून आली आहेत. परिस्थितीशी संघर्ष करुन त्यांनी हे यश कमावलय. बुधवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये कॅप्टन यश धुलच्या (Yash Dhull) (110) बरोबरीने शेख रशीदने (94) (Shaik Rasheed) सुद्धा भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. संघ अडचणीत असताना फलंदाजीला आलेल्या राशीदने केलेली 94 धावांची खेळी खूप महत्त्वाची आहे. शेख राशीदचा अंडर 19 वर्ल्डकपच्या टीम पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. परिस्थितीशी झुंज देऊन, संघर्ष करुन तो इथवर पोहोचलाय. यामध्ये त्याचे वडील बालिशा यांचे खूप मोठे योगदाने आहे. मुलाला यशस्वी क्रिकेटपटू बनवण्याची त्यांची धडपड, जिद्द, मेहनत यामुळेच आज हा दिवस पाहता आला. बालिशा यांनी परिस्थिती समोर हार मानली नाही. त्यांनी दोन हात केले आणि मुलाच्य टॅलेंटला न्याय दिला.

एमएसके प्रसाद यांना रशीदचा दोन गोष्टींसाठी अभिमान
शेख रशीदच्या (94) धावांच्या खेळीनंतर माजी यष्टीरक्षक आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांना दोन कारणांसाठी स्वत:चा भरपूर अभिमान वाटत असेल. शेख रशीद हा प्रसाद यांचे शहर आंध्र प्रदेशच्या गुंटुरचा रहिवाशी आहे आणि दुसरं म्हणजे शेख रशीद हे आंध्र प्रदेशातील क्रिकेट प्रबोधिनीचं उत्तम मॉडेल आहे. राज्य क्रिकेट असोशिएशनच्या संचालक पदावर असताना स्वत: एमएसके प्रसाद यांनी ही क्रिकेट प्रबोधिनी उभी केली आहे.
आंध्र प्रदेशात राहण्याची व्यवस्था असलेल्या तीन क्रिकेट प्रबोधिनी आहेत. राज्यातील क्रिकेट टॅलेंट शोधून त्यांना घडवणं, हे या अकादामींच मुख्य कार्य आहे. राशीद या यशाचा चेहरा आहे.

मुलाला मोठी स्वप्न बघण्यापासून रोखलं नाही
“शेख राशीदच्या यशाचं बरचस श्रेय त्याचे वडिल बालिशा यांना जातं. साामन्य कुटुंबातून आलेला राशीद विनम्र स्वभावाचा मुलगा आहे. त्याचे वडील एका किटकनाशकाच्या दुकानात काम करतात असं मला सांगण्यात आलं होतं. पण त्यांनी कधी त्यांच्या मुलाला मोठी स्वप्न बघण्यापासून रोखलं नाही” असं प्रसाद यांनी सांगितलं. ते टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.

तेलगु सोडून दुसऱ्याभाषेत बोलता येत नव्हतं
बालिशा यांनी जेव्हा फोन केला, तेव्हा त्यांना तेलगु सोडून दुसऱ्याभाषेत संवाद साधण जमत नव्हतं. त्यांनी तोडक्या-मोडक्या हिंदीमध्ये आपल्या मुलाला का संधी दिली पाहिजे? त्याची काय गुणवत्ता आहे, ते सांगितलं. “मंगलगिरी येथे असलेल्या आंध्र क्रिकेट अकादमीची आम्हाला भरपूर मदत झाली. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला.कोच क्रृष्ण राव सरांनी खूप मदत केली” असे बलिशा यांनी सांगितले. रशीद 10 वर्षाचा होण्याआधी बलिशा उपजिवीकेच्या शोधात हैदराबादला गेले. त्यावेळी आंतरजिल्हा स्पर्धांमध्ये रशीद चांगली कामगिरी करत होता. वयाच्या नवव्यावर्षी रशीदची आंध्र क्रिकेट प्रबोधिनीमध्ये निवड झाली. तिथे रशीदला सर्व सुविधा मिळाल्या. रहाण्यासाठी वसतिगृह, कपडे, जेवण आणि शिक्षण सगळ्याची व्यवस्था तिथे होती. अकदामीच शाळेची फी सुद्धा भरायची.

ALL THE BEST शेख रशीद
“रशीद सारख्या 30 ते 35 क्रिकेटपटुंना आंध्र क्रिकेट अकादमीनं दत्तक घेतलं. प्रत्येक मुलावर अकादमी महिन्याला 15 हजार रुपये खर्च करायची. रशीदची धावांची भूक आणि क्रिकेटबद्दलची प्रतिबद्धता तिथेच घडली” असं प्रसाद यांनी सांगितलं. असाच वेगवेगळ्या टप्प्यांमधून प्रवास करत शेख रशीद अंडर 19 च्या संघापर्यंत पोहोचला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. ALL THE BEST शेख रशीद

संबंधित बातम्या:

IND vs WI: आणखी एका स्फोटक फलंदाजाचा टीम इंडियात समावेश, एका षटकात भारताच्या बाजूने झुकवू शकतो सामना
IPL Auction आधीच बेबी एबीचा धमाका, डिविलियर्स सारखा खेळतो, सहा सामन्यात कुटल्या 506 धावा, मोडला भारतीयाचा वर्ल्ड रेकॉर्ड
PSL 2022: शाहिद आफ्रिदीची लज्जास्पद गोलंदाजी, फलंदाजांनी धावा लुटल्या, कुटकुट कुटला, पाहा गोलंदाजीचे आकडे

ICC Under 19 World Cup Father imp role in Shaik Rasheed success Andhra cricket adopted