SL vs BAN : श्रीलंकेचं 202 रन्सवर पॅकअप, बांगलादेश जिंकल्यास टीम इंडियाला टेन्शन

Sri Lanka vs Bangladesh Women 1st Inning : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये श्रीलंकेला बांगलादेश विरुद्ध 50 ओव्हरही खेळता आलं नाही. बांगलादेशने श्रीलंकेला 48.4 ओव्हरमध्ये गुंडाळलं.

SL vs BAN : श्रीलंकेचं 202 रन्सवर पॅकअप, बांगलादेश जिंकल्यास टीम इंडियाला टेन्शन
India vs Bangladesh Womens Semi Final Scenario
Image Credit source: (Bcci and Bangladesh Cricket X Account)
| Updated on: Oct 20, 2025 | 7:34 PM

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. उपांत्य फेरीत आतापर्यंत एकूण 3 संघांनी धडक दिली आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने सेमी फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे आता उर्वरित 1 जागेसाठी इतर संघांमध्ये जोरदार चुरस आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात सलग 2 सामने जिंकले. भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत केलं. मात्र त्यानंतर टीम इंडियाचा सलग 3 सामन्यांमध्ये पराभव झाला.

टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या 3 संघांनी पराभूत केलं. त्यामुळे आता टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं समीकरण अटीतटीचं झालं आहे. टीम इंडियाला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी उर्वरित 2 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. तसेच इतर संघांचा पराभव झाला तर टीम इंडियाला फायदा होईल. मात्र तसं होताना दिसत नाहीय.

श्रीलंकेचं 202 रन्सवर पॅकअप

वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 21 व्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. बांगलादेशने श्रीलंकेला 202 धावांवर गुंडाळलं आहे. श्रीलंकेला बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर धड 50 ओव्हरही खेळता आलं नाही. बांगलादेशने श्रीलंकेला 8 बॉलआधी अर्धात 48.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं.  त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी 203 धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील सहावा सामना आहे. श्रीलंकेचे 5 पैकी 2 सामने पावसामुळे वाया गेले. तर 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे श्रीलंकेचं जवळपास या स्पर्धेतून पॅकअप झालंय. मात्र श्रीलंकेने 202 रन्सवर ऑलआऊट होऊन बांगलादेशला उपांत्य फेरीच्या दिशेने जाण्यासाठी एका अर्थाने मदतच केलीय.

श्रीलंका बांगलादेश विरुद्ध 202 धावाचा बचाव करणार?

उपांत्य फेरीसाठी जोरदार रस्सीखेच

बांगलादेशने 5 पैकी 1 सामना जिंकलाय. तर 4 सामने गमावले आहेत. बांगलादेशने हा सामना चांगल्या फरकाने जिंकल्यास त्यांचे 4 गुण होतील शिवाय नेट रनरेट सुधारेल.,जे टीम इंडियाच्या सेमी फायनलच्या हिशोबाने पाहिल्यास काही प्रमाणात चिंताजनक आहे. त्यामुळे आता फलंदाजांनी निराशा केल्यानंतर गोलंदाज आपल्या जोरावर 202 धावांचा यशस्वी बचाव करुन पहिला विजय मिळवून देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तसेच श्रीलंकेच्या विजयाने एका अर्थाने भारताला फायदा होणार आहे. त्यामुळे श्रीलंकेनेच हा सामना जिंकावा, अशीच अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे. आता या सामन्याचा निकाल काय लागणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.