AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत आश्चर्यच..! हाताचा वापर न करता स्टंपिंग, कसं झालं ते पाहा Video

आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील 21व्या सामन्यात आश्चर्यकारक घटना घडली. या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजाचं नशिब फुटकं निघालं. ज्या पद्धतीने बाद झाली ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत आश्चर्यच..! हाताचा वापर न करता स्टंपिंग, कसं झालं ते पाहा Video
वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत आश्चर्यच..! हाताचा वापर न करता स्टंपिंग, कसं झालं ते पाहा Video Image Credit source: Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Oct 20, 2025 | 7:02 PM
Share

आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील 21 वा सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. या सामन्यातील पराभूत संघाचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे. पण उपांत्य फेरीचं किंचितसं समीकरण पाहता पराभूत झालेला संघ काही बाद होणार नाही. श्रीलंका बांग्लादेश यांच्यात डीवाय पाटील स्टेडियममध्ये सामना होत आहे. या सामन्यात श्रीलंकेची फलंदाज काविशा दिल्हारी ज्या पद्धतीने बाद झाली ते पाहून उपस्थितांना आणि सोशल मीडियावर व्हिडीओ पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण ती यष्टीचीत झाली. पण विकेटकीपरने हाताचा वापर न करता तिला बाद केलं. खरं तर विकेटकीपरला देखील कळलं नाही की हे कसं झालं. पण तिसऱ्या पंचांकडे निकाल गेला आणि काविशा बाद असल्याचं जाहीर केलं.

काविशा कशी बाद झाली ते समजून घ्या

श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 87 धावांवर तिसरी विकेट पडली आणि काविशा दिल्हारी फलंदाजीसाठी आली. तिने खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण 20 षटकात तिचं नशिब फुटकं निघालं. बांगलादेशकडून हे षटक टाकण्यासाठी फिरकीपटू नाहिदा अख्तर आली होती. तिने या षटकाचा पहिल्याच चेंडू आखुड टप्प्याच्या टाकला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. हा चेंडू खेळताना काविशा चाचपडली आणि बॅकफूटला खेळण्याचा प्रयत्न केला. असं करताना चेंडू बॅटला किनाऱ्याला घासला आणि विकेटकीपर निगार सुल्तानाच्या डाव्या मांडीला लागला आणि थेट स्टंपवर आदळला.

बांगलादेशी खेळाडूंनी स्टपिंगसाठी जोरदार अपील केली. कारण काविशा बॅकफूटला खेळतात पाय हवेत होता. त्यामुळे स्क्वेअर लेग पंचांनी थेट निर्णयाचा कौल तिसऱ्या पंचांकडे मागितला. पंचांनी व्हिडीओ तपासणी केली तेव्ही काविशाचा पाय हवेत असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तिला बाद असल्याचं घोषित केलं. यामुळे बांग्लादेश संघ उत्साहाने उड्या मारू लागला. निगार सुल्ताना आणि नाहिदा अख्तरने आनंद साजरा केला. तसंच खूप मोठा विजय मिळाला. खरं तर या विकेटमध्ये काविशाचं नशिबच फुटकं होतं असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, श्रीलंकेने 48.4 षटकात सर्व गडी गमवून 202 धावा केल्या आणि विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....