ICC WWC 2022: न्यूझीलंडला तिसरा झटका, राजेश्वरी गायकवाडने मिळवून दिलं यश

| Updated on: Mar 10, 2022 | 8:17 AM

आयसीसी महिला वर्ल्डकप 2022 (ICC Womens world cup 2022) स्पर्धेत भारत आज आपला दुसरा सामना खेळत आहे. न्यूझीलंड विरुद्ध हॅमिल्टनमध्ये (India vs Newzeland) हा सामना सुरु आहे.

ICC WWC 2022:  न्यूझीलंडला तिसरा झटका, राजेश्वरी गायकवाडने मिळवून दिलं यश
महिला वर्ल्डकप 2022 भारत वि न्यूझीलंड
Image Credit source: TwitterWHITEFERNS
Follow us on

हॅमिल्टन: आयसीसी महिला वर्ल्डकप 2022 (ICC Womens world cup 2022) स्पर्धेत भारत आज आपला दुसरा सामना खेळत आहे. न्यूझीलंड विरुद्ध हॅमिल्टनमध्ये (India vs Newzeland) हा सामना सुरु आहे. भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने धावांचे शतक ओलांडले आहे. अमेलिया कार आणि एमीची जोडी दमदार फलंदाजी करत होती. आतापर्यंत 20 षटकांचा खेळ झाला आहे. न्यूझीलंडची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. नऊ धावांवर भारताला पहिलं यश मिळालं. कडक फिल्डिंगमुळे भारताला न्यूझीलंडची पहिली विकेट लवकर मिळाली. पूजा वस्त्रकरच्या (Pooja Vastrakar) शानदार थ्रो मुळे सूजी बेट्स अवघ्या पाच धावांवर रनआऊट झाली. त्यानंतर अमेलिया कर आणि सोफिया डिवाइनने डाव सावरला. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागदारी केली.

राजेश्वरीने मिळवून दिलं यश

न्यूझीलंडची धावसंख्या 54 असताना भारताला दुसरं यश मिळालं. पूजा वस्त्राकरने घोषकरवी सोफिया डिवाइनला झेलबाद केलं. तिने 35 धावा केल्या. अमेलिया कार आणि एमीची जमलेली जोडी राजेश्वरी गायकवाडने फोडली. तिने अर्धशतक झळकावणाऱ्या कारला पायचीत पकडलं. ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवणार असं वाटत असतानाच राजेश्वरीने महत्त्वपूर्ण यश मिळवून दिलं. मागच्या सामन्यात राजेश्वरीने आपल्या फिरकी गोलंदाजीने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला होता. राजेश्वरीने 10 षटकात 31 धावा देत चार विकेट घेतल्या होत्या.

भारतीय संघात एक बदल

भारतीय संघाने या सामन्यात एक बदल केला आहे. खराब फॉर्ममुळे शेफाली वर्माला ड्रॉप करण्यात आलं आहे. न्यूझीलंडच्या टीमने संघात कोणताही बदल केलेला नाही. भारताने मागच्या सामन्यात पाकिस्तानवर 107 धावांनी मोठा विजय मिळवला होता. न्यूझीलंडचा भारताविरुद्ध तिसरा सामना आहे. आधी खेळलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला तर दुसऱ्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला.

भारत प्लेइंग XI: स्मृति मानधना, यास्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, ऋचा घोष, स्नेह राणा, पूजा वस्त्रकर, झूलन गोस्वामी

न्यूजीलंडची प्लेइंग XI: सोफिया डिवाइन, सूजी बेट्स, अमेलिया कर, एमी सैटर्थवेट, ली ताहुहू, मैडी ग्रीन, फ्रांसिस मॅके, कॅटे मार्टिन, जेस कर, हना रोव, हॅले येनसेन

संबंधित बातम्या:
ICC WWC 2022: ‘कॅचेस विन मॅचेस’ का म्हणतात, त्यासाठी हा VIDEO पहा, ‘तिने’ घेतलेला कॅच पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल
ICC WWC 2022: वेस्ट इंडिजने विजय अक्षरश: खेचून आणला, अनीसा मोहम्मदच्या ओव्हरमध्ये वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडचा ‘गेम’
AUS vs PAK, Womens World Cup 2022: बिस्माह मारुफचं अर्धशतक वाया, पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव