AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC WWC 2022: ‘कॅचेस विन मॅचेस’ का म्हणतात, त्यासाठी हा VIDEO पहा, ‘तिने’ घेतलेला कॅच पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल

ICC WWC 2022: न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धा (ICC Womens world cup) सुरु आहे. बुधवारी वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये सामना झाला.

ICC WWC 2022: 'कॅचेस विन मॅचेस' का म्हणतात, त्यासाठी हा VIDEO पहा, 'तिने' घेतलेला कॅच पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल
Image Credit source: Screengrab
| Updated on: Mar 09, 2022 | 12:49 PM
Share

ऑकलंड: न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धा (ICC Womens world cup) सुरु आहे. बुधवारी वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये सामना झाला. वेस्ट इंडिजने या रोमांचक सामन्यात सात धावांनी विजय मिळवला. वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजने इंग्लंडला नमवलं. (West indies vs England) खरंतर इंग्लंडने जिंकायचा सामना हरला. 18 चेंडूत त्यांना विजयासाठी 9 धावा हव्या होत्या आणि दोन विकेट शिल्लक होत्या. तरीही इंग्लंडला विजय मिळवता आला नाही. वेस्ट इंडिजने मिळवलेल्या विजयासह या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य ठरलं, ते म्हणजे डिएंड्रा डोटिनचा शानदार झेल. डिएंड्रा डोटिनने (Deandra Dottin) पॉईंटमध्ये अप्रतिम झेल घेतला. या कॅचला खरोखरच तोड नाही. प्रत्यक्ष मैदानावर ज्यांना हा झेल पाहता आला, ते खरोखरच नशिबवान आहेत.

तिने घेतलेल्या कॅचला तोड नाही

तिच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा झेल पाहणारे तिचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. डॉटिन या सामन्यात बॅटने कमाल दाखवू शकली नाही. पण तिने आपल्या कॅचने अनेकांना प्रभावित करुन सोडलं. टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या महिला संघाने 50 षटकात 225 धावा केल्या. त्यांनी धीम्या गतीने धावा जमवल्या. पण गोलंदाज आणि फिल्डर्सनी कमाल केली. त्यांच्यामुळेच वेस्ट इंडिजच्या महिला संघाला हा सामना जिंकता आला.

डॉटिनने असा घेतला शानदार झेल

डिएंड्रा डोटिनने नवव्या षटकात हा अप्रतिम झेल घेतला. शामिलिया कॉनेल गोलंदाजी करत होती. समोर स्ट्राइकवर इंग्लंडची फलंदाज विनफील्ड होती. ओव्हरच्या पहिल्याच षटकात विनफील्ड हिलने चेंडूला कट करुन पॉईंटच्या दिशेने फटका खेळला. डॉटिन पॉईंटला क्षेत्ररक्षण करत होती.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

तिने चित्त्याच्या चपळाईने चेंडूच्या दिशेने हवेत झेप घेऊन एका हाताने कॅच घेतला. हिलने फक्त 12 धावा केल्या. डोटिनच्या अप्रतिम कॅचमुळे तिला पॅव्हेलियनमध्ये माघारी परतावे लागले. डॉटिन शानदार कॅच पाहून ती सुद्धा हैराण झाली. या कॅचमुळेच वेस्ट इंडिजला पहिलं यश मिळालं. डोटिनने अक्षरक्ष: हा विकेट बनवला.

संबंधित बातम्या: 

AUS vs PAK, Womens World Cup 2022: बिस्माह मारुफचं अर्धशतक वाया, पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव Women’s World Cup 2022: आई बनल्यानंतर दुसऱ्याच सामन्यात पाक कॅप्टनने बलाढय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकली हाफ सेंच्युरी ICC WWC 2022: अरे हे काय, विकेट कसा काढायचा, बॉलचं ग्लोव्हजला चिकटला, वर्ल्डकपमधली घटना, पहा VIDEO

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.