WTC Final 2023 : फक्त 156 ग्राम वजनी वस्तूमुळे ओव्हलमध्ये होणार ऑस्ट्रेलियाचा ‘गेम ओव्हर’

| Updated on: Jun 02, 2023 | 8:27 AM

WTC Final 2023 : 'या' वस्तूच्या वापरात ऑस्ट्रेलियापेक्षा टीम इंडिया तरबेज. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये डब्ल्यूटीसी चॅम्पियनशिपची फायनल 7 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरु होणार आहे.

WTC Final 2023 : फक्त 156 ग्राम वजनी वस्तूमुळे ओव्हलमध्ये होणार ऑस्ट्रेलियाचा गेम ओव्हर
ind vs aus wtc final 2023
Image Credit source: BCCI
Follow us on

लंडन : ICC WTC Final 2023 सात ते 11 जून दरम्यान इंग्लंडच्या द ओव्हल मैदानात खेळली जाणार आहे. भारतीय टीम दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फायनलमध्ये पाऊल ठेवलय. दोन्ही टीम्स इंग्लंडमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांचा जोरदार सराव सुरु आहे. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियासाठी एक चिंतेची बाब आहे. या मॅचमध्ये वापरला जाणारा चेंडू. आयसीसीने स्पष्ट केलय की, फायनलसाठी ड्यूक चेंडूचा वापर करण्यात येईल.

इंग्लंडमध्ये ड्यूक चेंडूचा वापर केला जातो. टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलपासूनच या चेंडूने सराव करतायत. ऑस्ट्रेलियन टीमने इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर या चेंडूने सराव सुरु केलाय. त्यामुळे चेंडू हा ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय ठरु शकतो.

याच कारण इंग्लंडमधली परिस्थिती

ड्यूक हा सर्वाधिक स्विंग होणारा चेंडू समजला जातो. ऑस्ट्रेलियात वापरला जाणारा कुकाबुरा आणि भारतात वापरल्या जाणाऱ्या एसजी चेंडूच्या तुलनेत लाल चेंडू जास्त स्विंग होतो. इंग्लंडमधली परिस्थिती याच कारण आहे. ड्यूक चेंडू तीन चेंडूंपैकी सर्वोत्तम आहे. सर्वच टेस्ट मॅचेसमध्ये ड्यूक चेंडूचा वापर करण्याची चर्चा सुरु आहे.

जास्तवेळ चांगल्या शेपमध्ये राहतो

बाकी चेंडूंच्या तुलनेत ड्यूक चेंडू जास्तवेळ चांगल्या शेपमध्ये राहतो. अन्य चेंडूंचा शेप लवकर बिघडतो. ड्यूक चेंडूची शाइन आणि सीम बराचवेळ टिकून राहते. एसजी आणि कुकाबरा चेंडू टू पीस आहे. ड्यूक चेंडू फोर पीस आहे.


म्हणून मिळतो चांगला रिझल्ट

चेंडूची पॉलिश आणि शिलाई यावर चेंडू किती जास्तवेळ वापरता येणार, ते ठरतं. शिलाई मजबूत नसेल, तर चेंडू लवकर फाटतो आणि पॉलिश कमी असेल चेंडूची चमक निघून जाते. ड्यूक चेंडू डीप पॉलिश केला जातो. त्यानंतर हाताने शिलाई केली जाते. अन्य चेंडूंच्या तुलनेत हा चेंडू जास्त लाल असतो. याच कारण आहे, पॉलिशिंग प्रोसेस.

एमसीसीच्या नियमानुसार, पुरुष क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूच वजन 156 ते 163 ग्राम दरम्यान असलं पाहिजे. यापेक्षा कमी किंवा जास्त वजन नको. एमसीसी संस्था क्रिकेटचे नियम बनवते.

ऑस्ट्रेलियाची अडचण काय?

ऑस्ट्रेलियन टीमने ड्यूक चेंडूने जास्त सराव केलेला नाहीय. त्यामुळे भारताची बाजू वरचढ आहे. कारण भारतीय खेळाडू आधीपासून या चेंडूने सराव करतायत. भारतीय टीमकडे चांगेल स्विंग करणारे बॉलर्स आहेत. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव उत्तम चेंडू स्विंग करु शकतात. हे गोलंदाज ड्यूक चेंडूचा चांगला वापर करु शकतात.