वैभव सूर्यवंशीसारखं आता या खेळाडूंना आयपीएल खेळता येणार नाही, बीसीसीआयच्या नव्या नियमामुळे टाच!

IPL New Rule, U-16 Cricketers: बीसीसीआयने आयपीएलच्या नियमात आणखी एक सुधारणा केली आहे. यामुळे अंडर 16 क्रिकेटपटूंना वैभव सूर्यवंशीसारखं टी20 लीग स्पर्धेत खेळता येणार नाही. जाणून घ्या काय आहे नियम

वैभव सूर्यवंशीसारखं आता या खेळाडूंना आयपीएल खेळता येणार नाही, बीसीसीआयच्या नव्या नियमामुळे टाच!
वैभव सूर्यवंशीसारखं आता या खेळाडूंना आयपीएल खेळता येणार नाही, बीसीसीआयच्या नव्या नियमामुळे टाच!
Image Credit source: Getty Images
| Updated on: Sep 28, 2025 | 4:01 PM

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात श्रीमंत लीगपैकी एक आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळण्याचं अनेक क्रिकेटपटूंचं स्वप्न असतं. कारण एकदा या स्पर्धेत जम बसला की नशि‍बाचं दार आपोआप खुलतं. मग टीम इंडियातील प्रवेश असो की पैसा.. दोन्ही बाजूने क्रिकेटपटूंना बळ मिळतं. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत निवड व्हावी यासाठी क्रिकेटपटू प्रयत्नात असतात. वैभव सूर्यवंशीने तर वयाच्या 13व्या वर्षीच आयपीएलमध्ये झेंडा रोवला आहे. कमी वयात खेळणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. पण आता अंडर 16 क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळणं सोपं नाही. आता ते वैभव सूर्यवंशीसारखं आयपीएलमध्ये खेळू शकत नाही. यासाठी बीसीसीआयचा एक नियम भारी पडला आहे. नव्या नियामुळे देश विदेशातील अंडर 16 क्रिकेटपटू थेट आयपीएल खेळू शकणार नाहीत.

आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी यापूर्वी कोणतेच नियम नव्हते. ना वयाचं बंधन होतं ना काही नियम होता. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, अंडर 16 क्रिकेटपटूला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी किमान एक फर्स्ट क्लास सामन्याचा अनुभव असणं गरजेचं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेट खेळला नसेल तर कितीही प्रतिभावान खेळाडू असेल तर त्याला संघात जागा मिळणार नाही. या नियमावर 28 सप्टेंबरच्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मोहोर लागली. त्यामुळे आता कमीत कमी एक फर्स्ट क्लास सामना खेळणाऱ्या खेळाडूलाच आयपीएलमध्ये एन्ट्री मिळेल. तसं पाहीलं तर फर्स्ट क्लास क्रिकेट न खेळता थेट आयपीएल खेळणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे.

वैभव सूर्यवंशीने 13 व्या वर्षी आयपीएल खेळला

वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमधील सर्वात तरूण खेळाडू आहे. आयपीएल 2025 मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने मोठी बोली लावली. त्याची बेस प्राईस ही 30 लाख रुपये होती. पण त्याच्यासाठी 1.10 कोटी रुपये मोजले. जेव्हा त्याला संघात घेतलं तेव्हा त्याचं वय हे 13 वर्षे आणि 243 दिवस होतं. पण त्याच्याकडे फर्स्ट क्लास क्रिकेटचा अनुभव होता. इतकंच काय तर आयुष म्हात्रे, मुशीर खान, आंद्रे सिद्धार्थ हे अंडर 19 खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या फ्रेंचायझींकडून खेळले आहेत.