
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. राहुल द्रविड या स्पर्धेनंतर पायउतार होणार आहेत. त्यानंतर द्रविडच्या जागी मुख्य प्रशिक्षक या पदासाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी 13 मे रोजी अर्ज मागवले होते. मुख्य प्रशिक्षकपदासाठी 27 मे ही अखेरची तारखी होती. मीडिया रिपोर्ट्नुसार टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदाचा प्रबळ दावेदार आहे. मला टीम इंडियाचं हेड कोच म्हणून संधी मिळाली तर तो माझा सन्मान असेल, असं गंभीरने 2 जून रोजी एका कार्यकर्मात म्हटलं. त्यानंतर गंभीरच्या प्रतिक्रियेवर माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे.
जर त्याला (गौतम गंभीर) याला टीम इंडियाचा हेड कोच व्हावं असं वाटत असेल, तर मला वाटतं की तो त्या पदासाठी सर्वोत्तम उमेदवार असेल”, असं सौरव गांगुलीने म्हटलं. गंभीरच्या मार्गदर्शनात केकेआरने 10 वर्षानंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली. आयपीएल 2024 अंतिम सामन्यानंतर मैदानात बीसीसीआय अध्यक्ष जय शाह आणि गौतम गंभीर या दोघांची भेट झाली. त्यानंतर गौतम गंभीरच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार असल्याचं निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे.
टीम इंडियाला मार्गदर्शन करणं यापेक्षा कोणताही सन्मान नाही. मला टीम इंडियाची कोचिंग करणं आवडेल. आपल्या राष्ट्रीय संघाचं प्रशिक्षक असणं त्यापेक्षा कोणतीही मोठी बाब नाही, असं गंभीर 2 जून रोजी अबूधाबीतील एका कार्यक्रमात म्हणाला.
दादाकडून गंभीरला पसंती
#WATCH | On Gautam Gambhir’s “I would love to coach the Indian team”, former Team India Captain and ex-BCCI chief Sourav Ganguly says, “If he wants to do it, I think he will be a very good candidate.” https://t.co/RnmLGoOAxH pic.twitter.com/u5H3cSVWlP
— ANI (@ANI) June 3, 2024
“तुम्ही 140 कोटी भारतीय आणि जगातील लोकांचं प्रतिनिधित्व करत आहात.जेव्हा तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व करता, तेव्हा हे त्यापेक्षा मोठं कसं काय असू शकतं? मी टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी मदत करणार नाही, हे 140 कोटी भारतीय आहेत जे टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी मदत करतील”, असंही गंभीरने नमूद केलं होतं.