Smriti Mandhana : स्मृती मानधनाच्या डायटिशियनने अखेर सर्वच सांगितलं, आईच्या आनंदासाठी… काय केला मोठा खुलासा?
स्मृती मानधनाच्या साखर खाण्याच्या सवयीबद्दल तिच्या डायटिशियनने मोठा खुलासा केला आहे. स्मृती केवळ आईच्या आनंदासाठी गोड खाते, अन्यथा तिला साखरेची इच्छा नसते. हळूहळू साखरेची इच्छा कशी कमी होते आणि निरोगी आयुष्यासाठी साखर कमी करण्याचे सोपे उपायही डायटिशियनने सांगितले आहेत.

साखर खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही असं हेल्थ एक्सपर्ट नेहमी सांगत असतात. ज्या लोकांना साखर खाण्याची सवय आहे, अशांना तर साखर सोडणं म्हणजे महाकठिण काम असतं. साखरेने आजार जडतो. वजन वाढतं. त्यामुळे असंख्य क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकार साखर खात नाहीत. तसं ते जाहीरपणे सांगतही असतात. स्मृती मानधनासुद्धा (Smriti Mandhana) गोड खात नाही. पण आईच्या आनंदासाठी ती खात असते. स्मृती मानधनाच्या डायटिशियने तिच्या गोड खाण्याच्या सवयीबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला. सर्व काही सांगितलं. त्यामुळे स्मृतीच्या गोड खाण्यामागचं रहस्य समोर आलं आहे.
एका युट्यूब चॅनलला स्मृती मानधनाने तिच्या गोड खाण्यावर भाष्य केलं होतं. असं नाही की मी काहीही खाते. पण साखर अशी गोष्ट आहे की मी ती पूर्णपणे सोडू शकत नव्हते. आता साखर खाण्याची इच्छा होत नाही. फक्त आईच्या आनंदासाठीच मी साखर खाते. अन्यथा मी साखर खात नाही, असं स्मृती मानधनाने सांगितलं.
सांगलीत असते तेव्हा…
जेव्हा सांगलीत असते किंवा एखादा सण उत्सव किंवा महत्वाचा कार्यक्रम असतो तेव्हाच मी साखर खाते. मी माझ्या आईच्या आनंदासाठी खाते. तिला बरं वाटतं. मला खूप आवड आहे किंवा गोड खाण्याची इच्छा होतेय म्हणून मी खात नाही. माझी आई नेहमी मला नवीन रेसिपी बनवून खाऊ घालते. समजा जिलेबीची नवीन डिश बनवली तर ती मला खायला देते. मी सांगलीत नसेल आणि टूर नसेल तर एखाद दोन जिलेबी खाते, असंही तिने सांगितलं.
इच्छा कशी कमी झाली ?
स्मृतीची गोड खाण्याची इच्छा कशी काय कमी झाली याची माहिती अखेर समोर आली आहे. स्मृतीची डायटेशियन आणि डायबिटीज एज्युकेटर कनिका मल्होत्रा यांनी सांगितलं आहे. त्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. एखाद्याची साखर खाण्याची इच्छा हळूहळू कमी होते, ती ब्रेन रिवार्ड सिस्टिममधील न्यूरोप्लास्टिसिटीमुळे होते. हळूहळू साखर डोपामीन रिसेप्टरची संवेदनशीलता कमी करतो. म्हणजे तुम्ही साखर खाणं कमी करता त्यामुळे मेंदूला जो आनंद मिळतो तो हळूहळू कमी होतो. हळूहळू तुमच्या गटाचा मायक्रोबायोम बदलून जातो. त्यामुळे फायबर आणि कॉम्प्लेक्श कार्ब खाणारे गुड बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे हळूहळू साखर खाणं कमी करणं सोपं जातं, असं कनिका मल्होत्रा यांनी सांगितलं.
तुम्ही काय करू शकता?
जेव्हा तुम्ही त्रस्त असता तेव्हा खाण्याकडे जाणं स्वाभाविक असतं. पण इमोशनल ईटिंगला ट्रिगर समजून त्याला कमी केलं जाऊ शकतं. म्हणजे बिना साखरेचा चहा घ्या. फ्रुट्स वा नट्स खा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा. वॉक करा. कधी तरी कमी प्रमाणात साखर खा. जर साखर खाणं संपूर्णपणे बंद कराल तर साखर खाण्याची तीव्र इच्छा वाढेल.
