AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझी टीमचा मोठा निर्णय, 14 खेळाडूंना केलं रिटेन; 5 खेळाडू नव्याने सामील

टी20 लीगसाठी मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने आतापासूनच कंबर कसली आहे. आता मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. फ्रेंचायझीने 14 खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझी टीमचा मोठा निर्णय, 14 खेळाडूंना केलं रिटेन; 5 खेळाडू नव्याने सामील
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 20, 2024 | 5:07 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी बरीच उलथापालथ सुरु असल्याचं दिसत आहे. मेगा लिलावापूर्वी रिटेंशन पॉलिसी जाहीर होणार आहे. पण अद्याप त्यावर ठोस अशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. असं सर्व सुरु असताना मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझी संघाने मोठी घोषणा केली आहे. युएईत खेळल्या जाणाऱ्या आयएल टी20 लीगच्या तिसऱ्या पर्वासाठी फ्रेंचायझी टीमने रणनिती जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीच्या एमआय एमीरेट्ससह सहा संघांनी आपल्या संघाबाबत घोषणा केली आहे. आयएल टी20 लीग स्पर्धेचं तिसरं पर्व 11 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे. तसेच 9 फेब्रुवारीला अंतिम सामना होणार आहे. आयएल टी20 अधिकृतपणे जाहीर केलं की, तिसऱ्या पर्वात जेसन रॉय (शारजाह वॉरियर्स), फखर जमान (डेजर्स वायपर्स), शाई होप (दुबई कॅपिटल्स), लॉकी फर्ग्युसन (डेजर्स वायपर्स), रोस्टन चेस (अबूधाबी नाईट रायडर्स), मॅथू वेस (शारजाङ वॉरियर्स), इब्राहिम जादरान (गल्फ जायंट्स) आणि रोमारिया शेफर्ड (एमआय एमिरेट्स) हे पहिल्यांदा खेळणार आहेत.

मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीच्या एमीरेट्स संघाने रोमारियो शेफर्ड (वेस्ट इंडिज), फरीद मलिक (अफगाणिस्तान), टॉम बॅन्टन (इंग्लंड), थॉमस ड्रॅका (इटली) आणि बेन चार्ल्सवर्थ (इंग्लंड) यांना साईन केलं आहे. या पाच खेळाडूंचा संघात नव्याने समावेश झाला आहे. या व्यतिरिक्त फ्रेंचायझी संघाने 14 खेळाडूंना रिटेन केलं आहे. निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड, अकेल होसेन, आंद्रे फ्लेचर, डॅनियल मौसली, ड्वेन ब्राव्हो, फाझलहक फारुकी, जॉर्डन थॉम्पसन, कुसल परेरा, रोहित खान, मुहम्मद वसीम, नोस्थुश केन्थ्या, विजिथ्या केंज्या आणि वकार सलामखेल या खेळाडूंना रिटेन केलं आहे.

तिसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाचा स्टार डेविड वॉर्नर आणि श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका खेळताना दिसतील. यासोबत वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू सुनील नरीन, आंद्रे रसेल, ड्वेन ब्रावो, किरोन पोलार्ड आणि रोवमॅन पॉवेल आपआपल्या संघातून खेळतील. दुसरीकडे, दुबई कॅपिटल्सने एडम रॉसिंगटन, ब्रँडन मॅकमुलेन, गरुका संकेथ, गुलबदीन नइब, जेफ्री वेंडरसे, जो बर्न्स, जो वेदरली, नजीबुल्लाह जादरान, ओबेद मॅककॉय, स्कॉट कुगलेइजिन, शराफुद्दीन अश्रफ आणि शाई होप यांच्याशी करार केला आहे.

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.