T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा उत्साह शिगेला, एक आव्हान पूर्ण करताच भारताचा विजय पक्का

| Updated on: Oct 20, 2021 | 9:25 PM

भारताने दोन्ही सराव सामन्यात विजय मिळवला असून आता भारतीय खेळाडू थेट विश्वचषकातील पहिल्या सामन्यातचं मैदानात उतरतील. 24 ऑक्टोबर रोजी हा सामना असून यावेळी पाकिस्तानचा संघ भारतासमोर असणार आहे.

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा उत्साह शिगेला, एक आव्हान पूर्ण करताच भारताचा विजय पक्का
भारत विरुद्द पाकिस्तान
Follow us on

दुबई: टी-20 विश्वचषकासाला (T20 World Cup) अखेर सुरुवात झाली आहे. सध्या ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार सुरु आहे. कमी ताकदीच्या संघामध्येही चुरशीचे सामने होत असल्याने आगामी सुपर 12 गटाचे सामने किती चुरशीचे होतील. याचा तुम्ही विचार करु शकता. या गटातील भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (India vsPakistan) संघाशी होणार आहे. या सामन्यांना दोन्ही संघ सज्ज झाले असून विजयासाठी दोघेही शर्थीचे प्रयत्न करणार हे नक्की! सध्या भारतीय संघ चांगल्या लयीत असला तरी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एक खेळाडू भारतासाठी मोठं आव्हान असल्याची चेतावणी इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉंटी पनेसर (Monty Panesar) याने दिली आहे.

त्याच्या मते सध्या भारतीय संघ उत्तम कामगिरी करत आहे. पण पाकिस्तानचा संघही चांगल्या लयीत असला तरी त्यांची फलंदाजी ही कर्णधार बाबर आजमवर (Babar Azam) फार अवलंबून आहे. त्यामुले त्याला लवकर बाद केल्यास भारताचा विजय अधिक सोपा होईल. त्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले, “जर भारतीय गोलंदाज बाबर आजमला लवकर बाद करतील. तर पाकिस्तानची फलंदाजी लवकर ढासळेल.”

शाहीन आफ्रीदीही एक धोका

पनेसरयाने फलंदाजीनंतर गोलंदाजीबाबत सूचना देतना पेसर शाहीन शाह आफ्रीदीबद्दल अधिक चेतावनी दिली. त्याला पाकिस्तानच्या गोलंदाजीचा प्रमुख खेळाडू सांगत. त्याला सामना करण मोठं आव्हान असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, “पाकिस्तानसाठी बाबर आजम आणि शाहीन हे प्रमुख खेळाडू आहेत. शाहीद डाव्या हाताने उत्कृष्ट गोलंदाजी करतो. त्यामुळे तो अधिक भारतीय फलंदाजाना बाद करु शकतो. त्यामुळे मला अपेक्षा आहे, विराट आणि केएल राहुलने या डावखुऱ्या गोलंदाजाविरुद्ध चांगला सराव केला असावा.”

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य पाकिस्तानी संघ – बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह अफरीदी, हसन हली आणि हारिस रऊफ.

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दीक पंड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

हे ही वाचा-

T20 World Cup मधील बांग्लादेशचं आव्हान कायम, ओमानवर 26 धावांनी विजय

T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास

T20 World Cup मध्ये स्कॉटलंडच्या खेळासह जर्सीही फॅन्सना आवडली, 12 वर्षांची चिमुरडी आहे डिझायनर

(In india vs pakistan match babar azam is main player which early wicket will help india to win the fame says monty panesar)