AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 चेंडूत ठोकल्या 40 धावा, रहाणे-शॉसमोर छत्तीसगडचा फलंदाज पडला भारी, मुंबईचा संघ 1 रनने पराभूत

टी20 विश्वचषकातील भारताचं आव्हान संपला आहे. पण दुसरीकडे सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली चषकात मात्र दररोज धमाकेदार सामने होत आहेत.

8 चेंडूत ठोकल्या 40 धावा, रहाणे-शॉसमोर छत्तीसगडचा फलंदाज पडला भारी, मुंबईचा संघ 1 रनने पराभूत
शशांक सिंग
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 8:37 PM
Share

मुंबई: टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup 2021) भारतीय संघाचं (Indian Cricket Team) आव्हान संपुष्टात आलं आहे. सेमीफायनलच्या फेरीत भारत पोहचू शकलेला नाही. त्यामुळे सध्या भारतीय क्रिकेटप्रेमी निराश आहेत. पण दुसरीकडे देशांतर्गत सुरु असलेल सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेत (SMAT 2021) दररोज उत्कृष्ट सामने पार पडत आहेत. मग एकीकडे आयपीएल गाजवणारा ऋतुराज गायकवाड प्रत्येक सामन्यात तुफान खेळी करत असताना आता आज (8 नोव्हेंबर) झालेल्या मुंबई विरुद्ध छत्तीसगड सामन्यातही एक तुफान खेळी दिसून आली. ही खेळी छत्तीसगडच्या खेळाडूने खेळली आहे. विशेष म्हणजे या सामनयात टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू असलेला मुंबईचा (Mumbai Cricket Team) संघ अवघ्या 1 रनने हारला आहे.

यावेळी मुंबईच्या खेळाडूंवर छत्तीसगडचा एक खेळाडू भारी पडला आहे. आतापर्यंत मुंबई संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली 4 पैकी 2 सामने गमावले आहेत. छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा संघ 20 ओव्बरमध्ये 158 धावांच  लक्ष्य गाठू न शकल्याने पराभूत झाला आहे. छत्तीसगडच्या संघाने उत्तम गोलंदाजी केलीच. पण फलंदाजीवेळी त्यांचा  29 वर्षीय खेळाडू शशांक सिंगने धमाकेदार फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजाची धुलाई केली.

203 च्या स्ट्राइक रेटने ठोकलं अर्धशतक

प्रथम फलंदाजी करताना छत्तीसगडच्या संघाने 50 धावांवर 3 विकेट गमावले होते. तेव्हाच अखिल हेरवाड़करने  शशांक सिंगसोबत 80 धावांची भागिदारी केली. यावेळी शशांकने तुफानी फलंदाजी करत 28 चेंडूत 203 च्या स्ट्राइक रेटने 57  धावा ठोकल्या. यातील 40 रन त्याने 8 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकार ठोकत केले आहेत. याच्या जोरावरच छत्तीसगडने 20 ओव्हरमध्ये 157 धावा केल्या.  ज्यानंतर मुंबईची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ शून्यालवर तर यशस्वी जैस्वाल 3 धावा करु बाद झाला. त्यानंतर कर्णधार रहाणे आणि  सिद्धेश लाडने 75 धावांची भागिदारी केली. लाड 46 धावा करु बाद झाला. रहाणेने 69 धावा करुन बाद झाला. अखेरच्या षटकात मुंबईला 7 धावांची गरज असताना सौरभ मजूमदारने केवळ 6 धावा देत 1 रनने संघाला विजय मिळवून दिला.

इतर बातम्या

मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

T20 World Cup India vs Namibia live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारताचा विश्वचषकातील शेवटचा सामना

(In Syed mushtaq ali trophy chhattisgarh beat mumbai by 1 run shashank singhs 57 runs made big diffrence)

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...