IPL 2022, GT vs SRH, Purple Cap : पर्पल कॅपमध्ये नटराजनला धक्का देत मलिक दुसऱ्या स्थानी, कुलदीपची देखील पिछेहाट

| Updated on: Apr 28, 2022 | 7:51 AM

कालच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय जाणून घेऊया

IPL 2022, GT vs SRH, Purple Cap : पर्पल कॅपमध्ये नटराजनला धक्का देत मलिक दुसऱ्या स्थानी, कुलदीपची देखील पिछेहाट
टी नटराजनला धक्का देत उमरान मलिक दुसऱ्या क्रमांकावर आला आहे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : दरवर्षी आयपीएल (IPL 2022) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. या टेबलमध्ये रोज सामन्यानंतर बदल होत असतो. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचा केन विलियमसनच्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध (GT vs SRH) सामना झाला.  सनरायजर्स हैदराबादने गुजरातला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी 23 धावांची गरज होती. राहुल तेवतिया आणि राशिद खानची जोडी मैदानात होती. मार्को जॅनसेन गोलंदाजी करत होता. राशिद खानने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून गुजरातला एक थरारक विजय मिळवून दिला. राशिद खानने 11 चेंडूत नाबाद 31 धावा काढल्या. गुजरातने सनरायजर्स हैदराबादवर पाच विकेटने विजय मिळवला. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

पर्पल कॅपच्या यादीत युझवेंद्र चहल पहिल्या स्थानावर आहे. त्याने 18 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर टी नटराजनला धक्का देत उमरान मलिक त्याच्या जागी आला आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 15 विकेट घेतल्या आहे. तर त्यानंतर तिसऱ्या स्थानावर टी नटराजनची पिछेहाट झाली असून त्याने देखील आतापर्यंत पंधरा विकेट घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी ड्वेन ब्राव्हो यांनी 14 विकेट आयपीएलच्या सीजनमध्ये घेतल्या आहेत. पाचव्या स्थानी कुलदीप यादवला धक्का देत मोहम्मद शमी आला असून त्याने तेरा विकेट घेतल्या आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा
24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक
22444
कुलदीप यादव21419

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

मलिक आणि हार्दिकचा आमना-सामना

कालच्या सामन्यात पुन्हा एकदा उमरान मलिक आणि हार्दिकचा आमना-सामना झाला. त्यावेळी उमराने मलिकने टाकेलला एका बाऊन्सर चेंडू त्याच्या उजव्या खांद्याला जोरात लागला. फिजियोने सुद्धा उपचार देण्यासाठी लगेच मैदानात धाव घेतली. प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेली हार्दिकची बायको नताशा हार्दिकला चेंडू शेकल्यानंतर लगेच उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसत होते. पण हार्दिक लढवय्या आहे. दुसऱ्या चेंडूवर त्याने उमरान मलिकला जोरदार पंच मारुन चेंडू सीमापार पाठवला.