AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, GT vs SRH, Orange cap : ऑरेंज कॅपमध्ये शिखर धवनला धक्का देत पांड्याची आगेकूच, तर डु प्लेसिस टॉप फाईव्ह बाहेर

काल वानखेडे स्टेडियमवर हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्सने सामना जिंकला. यानंत ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय. जाणून घ्या...

IPL 2022, GT vs SRH, Orange cap : ऑरेंज कॅपमध्ये शिखर धवनला धक्का देत पांड्याची आगेकूच, तर डु प्लेसिस टॉप फाईव्ह बाहेर
हार्दिक पांड्याImage Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Apr 28, 2022 | 8:38 AM
Share

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचा केन विलियमसनच्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध (GT vs SRH) सामना झाला.  गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) काल हरलेला सामना जिंकला. या विजयाचा नायक ठरला राशिद खान. (Rashid Khan) सनरायजर्स हैदराबादने गुजरातला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी 23 धावांची गरज होती. राहुल तेवतिया आणि राशिद खानची जोडी मैदानात होती. मार्को जॅनसेन गोलंदाजी करत होता. राशिद खानने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून गुजरातला एक थरारक विजय मिळवून दिला. राशिद खानने 11 चेंडूत नाबाद 31 धावा फटकावल्या. यात चार सिक्स होते. राहुल तेवतिया (Rahul Tewtia) 21 चेंडूत 40 धावांवर नाबाद राहिला. त्याने चार चौकार आणि दोन सिक्स मारले. गुजरातने सनरायजर्स हैदराबादवर पाच विकेटने विजय मिळवला. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये ऑरेंज कॅपच्या टेबलमधील सर्वाधिक धावा काढणाऱ्या पहिल्या पाच खेळाडुंवर नजर टाकुया. ऑरेंज कॅपच्या लिस्टमध्य्ये पहिल्या क्रमांकावर जोस बटलर आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 499 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आहे. त्याने 368 धावा या सीजनमध्ये केल्या आहेत. कालच्या गुजरातविरुद्ध हैदराबादच्या सामन्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवनला धक्का देत हार्दिक पांड्या आला आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 305 धावा काढल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर शिखर धवन गेला असून त्याने आतापर्यंत 302 धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर अभिषेक शर्माने डु प्लेसिसला धक्का देत आपलं स्थान पक्क केलं आहे. त्याच्या धावा 285 झाल्या आहेत.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्स

मोक्याच्याक्षणी राहुल आणि राशिदने आपली बॅट चालवली. दोघांनी या ओव्हरमध्ये चार सिक्स मारुन गुजरातला स्पर्धेतील सर्वात रोमांचक विजय मिळवून दिला. गुजरातला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची आवश्यकता होती. राशिद खान स्ट्राइकवर होता. त्याने थेट सिक्स मारुन मॅचच संपवली.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार