AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, RCB vs RR, Orange cap : ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये डु प्लेसिसची आगेकूच, तुमचा आवडता खेळाडू कुठे?, वाचा सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांविषयी

मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यात राजस्थानने रॉयल विजय मिळवला. यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये बदल झालाय. वाचा सविस्तर

IPL 2022, RCB vs RR, Orange cap : ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये डु प्लेसिसची आगेकूच, तुमचा आवडता खेळाडू कुठे?, वाचा सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांविषयी
डु प्लेसिसची ऑरेंज कॅपमध्ये आगेकूचImage Credit source: twitter
| Updated on: Apr 27, 2022 | 7:27 AM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील मंगळवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धच्या सामन्यात राजस्थानने (RR) रॉयल विजय मिळवला. यावेळी राजस्थानने बंगलोरवर 29 धावांनी विजय मिळवला. राजस्थानने काल सामना  जिंकून मागच्या पराभवाचा हिशेब चुकता केला. राजस्थानची फलंदाजी अपेक्षेनुसार झाली नाही. 20 षटकात त्यांना फक्त 144 धावाच करता आल्या. रियान परागमुळे राजस्थानला लढण्याइतपत धावसंख्या उभारता आली. RCB ला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले होते. T-20 क्रिकेटच्या दृष्टीने ही फार मोठी धावसंख्या नाहीय. पण राजस्थानच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करुन आरसीबीला विजयपासून वंचित ठेवलं. राजस्थानच्या 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चं डाव 115 धावात आटोपलं. RCB चा संघ रथी-महारथी स्टार खेळाडूंनी भरलेला आहे. वास्तविक त्यांच्यासाठी हे खूप सोपं लक्ष्य होतं. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत बदल झालाय.

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये ऑरेंज कॅपच्या टेबलमधील सर्वाधिक धावा काढणाऱ्या पहिल्या पाच खेळाडुंवर नजर टाकुया. ऑरेंज कॅपच्या लिस्टमध्य्ये पहिल्या क्रमांकावर जोस बटलर आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 499 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आहे. त्याने 368 धावा या सीजनमध्ये केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे. त्याने आतापर्यंत 302 धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्या हा चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 295 धावा केल्या आहेत. त्यानंतर तिलक वर्माला मागे टाकत डु प्लेसिसने पाचव्या स्थानी आगेकूच केली असून त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 278 धावा काढल्या आहेत. तर तिलक वर्मा हा सहाव्या स्थानी गेला आहे.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

बटलरकडून निराशा

राजस्थानकडून अपेक्षित फलंदाजी झाली नाही. जोस बटलर खूपच लवकर आऊट झाला. जोस बटलरची बॅट तळपली नाही. त्याचा परिणाम राजस्थानच्या संघाच्या कामगिरीतून दिसून आला. RCB विरुद्ध जोस बटलरने नऊ चेंडूत फक्त आठ धावा केल्या. त्याने फक्त एक चौकार लगावला. IPL 2022 च्या पीचवर बटलरची ही आठवी इनिंग होती. 88.88 त्याचा स्ट्राइक रेट होता.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.