IPL 2021 Final मध्ये चेन्नईच्या त्रिकुटाने रचला इतिहास, शतक, द्विशतकासह त्रिशतकही नोंदवलं

| Updated on: Oct 15, 2021 | 10:53 PM

आयपीएलच्या 14 व्या पर्वाचा अंतिम सामना सुरु असून केकेआर आणि सीएसके दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. पण सीएसकेच्या तीन खेळाडूंनी मात्र या सामन्यात अनोखे विक्रम नोंदवले आहेत.

IPL 2021 Final मध्ये चेन्नईच्या त्रिकुटाने रचला इतिहास, शतक, द्विशतकासह त्रिशतकही नोंदवलं
चेन्नई सुपरकिंग्सचा संघ
Follow us on

दुबई: आयपीएलच्या 14 व्या पर्वातील अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) यांच्यात सुरु असून चेन्नईची फलंदाजी पूर्ण झाली आहे. चेन्नईने 193 धावांचे आव्हान केकेआरसमोर ठेवले आहे. अद्याप सामन्याचा निर्णय़ लागला नसला तरी या सामन्यात चेन्नईच्या तीन दिग्गजांनी अनोखे तीन विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत.

यामध्ये सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने कर्णधार म्हणून आज त्याचा 300 वा टी20 सामना खेळला आहे. याआधी भारतीय संघासह आयपीएलमध्ये काही काळ पुणे सुपरजायंट्ससाठी टी20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलेल्या धोनीने चेन्नई संघासाठी सर्वाधिक सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत. तर संघाचा उत्कृष्ट अष्टैपूल खेळाडू रवींद्र त्याचा 200 वा सामना खेळत असून दिग्गज सलामीवीर फाफने 100 वा सामना खेळला आहे. त्यामुळे या तिघांनी एकाच सामन्यात अनोख्या प्रकारचे शतक, द्विशतक आणि त्रिशतक नावे केले आहे.

धोनीच्या आसपासही कोणी नाही

धोनी शिवाय या बाबतीत दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी हा आहे. त्याने 200 च्या जवळपास सामन्यात टी20 संघाचा कर्णधार म्हणून काम पाहिलं आहे.  वेस्टइंडीजला दोनदा टी20 वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा सॅमी 208 टी20 सामने कर्णधार म्हणून खेळला आहे. तो आता निवृत्त झाला असून जवळपास 100 सामन्यांनी धोनीच्या मागेच आहे. याशिवाय कोणताच खेळाडू धोनीच्या आसपासही नाही.

फाफची धमाकेदार खेळी

दुसरीकडे आपला 100 वा सामना खेळणाऱ्या फाफने उत्कृष्ट खेळी करत 86 धावा लगावल्या. त्याने 59 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार खेचत 86 धावा केल्या आहेत. अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मावीने त्याला झेलबाद केलं. पण फाफच्या खेळीच्या जोरावरच संघाने 192 धावांपर्यंत मजल मारली आहे.

हे ही वाचा

T20 World Cup 2021 मध्ये पाकिस्तानची पहिली लढत भारताशी, सामन्याच्या काही दिवस आधीच संघाला मोठा झटका

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मॅक्सवेलची गर्लफ्रेंड भारतीय वंशाची, लवकरच लग्नबंधनात अडकणार, पाहा PHOTO

पंचांच्या निर्णयाआधीच पव्हेलियनकडे परतणारी पूनम राऊत म्हणते, ‘हा खेळ आहे, युद्ध नाही’

(In todays IPL Final in CSK vs KKR MS Dhoni to become First captain to lead in 300 t20 matches also jadeja and Faf played 200th and 100th match respectively)