IPL 2021 KKR vs MI Live Streaming: मुंबई विरुद्ध कोलकाता हायव्होल्टेज सामना, कुठे, कधी, कशी पाहणार मॅच?

नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईला चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये कर्णधार केरॉन पोलार्ड विजय मिळवून देऊ शकला नाही. आता आज कोलकात्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजयाची चव चाखण्यासाठी मुंबई इंडियन्स आतुर झालेला आहे.

IPL 2021 KKR vs MI Live Streaming: मुंबई विरुद्ध कोलकाता हायव्होल्टेज सामना, कुठे, कधी, कशी पाहणार मॅच?
मुंबई इंडियन्स संघ
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 9:37 AM

IPL 2021 : आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला धोनीच्या चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईला या मॅचमध्ये कर्णधार केरॉन पोलार्ड विजय मिळवून देऊ शकला नाही. आता आज कोलकात्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजयाची चव चाखण्यासाठी मुंबई इंडियन्स आतुर झालेला आहे. बुधवारी दिल्लीने हैदराबादवर विजय मिळवून गुणतालिकेत प्रथमक क्रमांकावर झेप घेतलीय. त्यामुळे मुंबईला जर टॉप 4 मध्ये टिकून राहायचं असेल तर आज होणाऱ्या सामन्यात कोलकात्याला आस्मान दाखवावंच लागेल.

इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि अष्टपैलू आंद्रे रसेलने आरसीबीविरुद्ध चमकदार गोलंदाजी केली आणि शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरच्या चमकदार खेळीमुळे 10 ओव्हर बाकी असताना लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला. केकेआरने या सामन्यात त्यांची आक्रमक मनोवृत्ती दाखवली आणि त्याच आक्रमतकेने मुंबईविरुद्ध ते पुन्हा एकदा मैदानात उतरतील.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कधी होणार?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना गुरुवारी, 23 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे खेळला जाईल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळला जाईल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना किती वाजता सुरू होईल?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचे थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्याचं स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण होईल. हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रिमिंग असेल.

कोलकाता नाइट राइडर्स: ऑयन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकीरत सिंह मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंह, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पवन नेगी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम दुबे, टीम साउदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शाकिब अल हसन, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, शेल्डन जॅक्सन, टीम सिफर्ट.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्मधार) क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, क्रिस लिन, सौरभ तिवारी, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, जेम्स नीशम, जयंत यादव, किरन पोलार्ड , मार्को जॅनसेन, युद्धवीर सिंह, अॅडम मिल्ने, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मोहसिन खान, नॅथन कूल्टर-नाइल, पीयूष चावला, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट.

(IPL 2021 kolkata knight Riders vs mumbai Indians live Streaming When And Where To watch Online Free in marathi on 23rd September)

हे ही वाचा :

IPL 2021 : वैयक्तिक आयुष्यात धक्के, पण बॅट मात्र तळपतीच, प्रत्येक हंगामात शिखरकडून रन्सचा पाऊस, प्रतिस्पर्ध्यांना धसका!

IPL 2021: हैद्राबाद पराभूत, पण पर्पल कॅपच्या शर्यतीत ‘हा’ खेळाडू दाखल, पाहा संपूर्ण यादी

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.