IND A vs SA A : टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार?

India A vs South Africa A 3rd Unofficial Odi Live Streaming : तिलक वर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीम विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील तिसरा आणि शेवटचा सामन्याला अवघे काही तास बाकी आहेत.

IND A vs SA A : टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार?
India A vs South Africa A
Image Credit source: TV9 Bharatvarsh
| Updated on: Nov 18, 2025 | 11:05 PM

इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सिनिअर टीममध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यात 3 अनऑफीशियल वनडे मॅचची सीरिज खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने या मालिकेत तिलक वर्मा याच्या नेतृत्वात आणि पुणेकर ऋतुराज गायकवाड याच्या उपकर्णधारपदात जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने सलग 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता टीम इंडियाकडे सलग आणि एकूण तिसरा सामना जिंकण्याची संधी आहे. या तिसऱ्या आणि अंतिम सामन्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए सामना कधी?

इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए सामना बुधवारी 19 नोव्हेंबरला होणार आहे.

इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए सामना कुठे?

इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.

इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए सामना टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. मात्र हा सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहायला मिळेल.

इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

ऋतुराज गायकवाड याला रोखण्याचं आव्हान

भारताने रविवारी 16 नोव्हेंबरला सलग दुसरा सामना जिंकत मालिका आपल्या नावावर केली. भारताने दुसरा सामना हा 9 विकेट्सने जिंकला. तर त्याआधी 13 नोव्हेंबरला भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. भारताला या दोन्ही सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना जिंकून देण्यात ऋतुराज गायकवाड याने प्रमुख भूमिका बजावली. ऋतुराजने पहिल्या सामन्यात शतक तर दुसर्‍या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. ऋतुराजने 117 आणि नाबाद 68 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला तिसरा आणि शेवटचा सामना जिंकायचा असेल तर त्यांना कोणत्याही स्थितीत ऋतुराज गायकवाड याला झटपट आऊट करावं लागणार आहे.