
टीम इंडिया वूमन्स ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स ए यांच्यातील एकमेव अनधिकृत कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने या एकमेव सामन्यातील पहिला दिवस गाजवला. टीम इंडियाने पहिल्या दिवशी कांगारुंना 212वर गुंडाळल्यानंतर 2 विकेट्स गमावून 100 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाने 84 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स गमावल्या. टीम इंडियाचा पहिला डाव अशाप्रकारे 184 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाला यासह 28 धावांची आघाडी मिळाली.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात खेळ संपेपर्यंत 60 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 192 धावांनी आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाकडून दुसर्या डावात एम्मा डी ब्रो आणि मॅडी डार्क या दोघांनी अनुक्रमे 58 आणि 54 धावांची खेळी केली. मॅटलान ब्राउनने 26 धावांचं योगदान दिलं. निकोल फाल्टम हीने 16 धावांची भर घातली. तर इतर फलंदाज टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरले. टीम इंडियासाठी कॅप्टन मिन्नू मणी हीने दुसऱ्या डावातही 5 विकेट्स घेतल्या. तर सायली सातघरे आणि प्रिया मिश्रा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान टीम इंडियाने 73.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 184 धावा केल्या. टीम इंडियासाठी श्वेता सेहरावत हीने सर्वाधिक 40 धावा केल्या. तेजल हसबनीसने 32 धावांची खेळी केली. शुभा सतीशने 22 रन्स केल्या. सायली सातघरेने 21 दावा जोडल्या. मन्नत कश्यपने 19 धावांची भर घातली. राघवी बिष्ट हीने 16 तर कॅप्टन मिन्नू मणी हीने 17 धावांचं योगदान दिलं. तर ऑस्ट्रेलियासाठी केट पीटरसन हीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाकडे 192 धावांची आघाडी
5/16 for Kate Peterson bundles India A for 184 on Day 2.
In response, Minnu Mani picks another fifer to restrict Australia A to 164/7 at the end. #CricketTwitter #AUSvIND pic.twitter.com/6sdXMDSwT9
— Female Cricket (@imfemalecricket) August 23, 2024
वूमन्स ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन : चार्ली नॉट (कर्णधार), एम्मा डी ब्रो, जॉर्जिया वॉल, निकोल फाल्टम, टेस फ्लिंटॉफ, मॅडी डार्क (विकेटकीपर), मॅटलान ब्राउन, केट पीटरसन, लिली मिल्स, ग्रेस पार्सन्स आणि निकोला हॅनकॉक.
वूमन्स इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : मिन्नू मणी (कर्णधार), श्वेता सेहरावत, प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, बिस्त राघवी, सजीवन सजाना, उमा चेत्री (विकेटकीपर), मन्नत कश्यप, प्रिया मिश्रा आणि सायली सातघरे.