AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, अफगाणिस्तान मालिका जिंकण्यापासून रोखणार?

India vs Afghanistan 2nd Odi : अफगाणिस्तानला आतापर्यंत एकदाही टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय सामन्यात जिंकता आलेलं नाही. त्यामुळे अफगाणिस्तान 17 जूनला करो या मरो स्थितीत विजयाचं खातं उघडणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

IND vs AFG : टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, अफगाणिस्तान मालिका जिंकण्यापासून रोखणार?
India vs Afghanistan 2nd Odi Live Streaming and PreviewImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 16, 2026 | 11:45 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानवर एकमेव कसोटी सामन्यात डाव आणि 300 धावांनी मात केली. भारताचा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. त्यानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली. भारताने शनिवारी 13 जून रोजी अफगाणिस्तानवर मात केली. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा सामना हा बुधवारी होणार आहे. टीम इंडियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर अफगाणिस्तानसाठी हा सामना करो या मरो असा आहे. या निमित्ताने सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान दुसरा एकदिवसीय सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी 17 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान दुसरा एकदिवसीय सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान दुसरा एकदिवसीय सामना लखनौमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम इथे खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

पहिल्या सामन्यात काय झालं?

धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये उभयसंघातील सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पावसामुळे हा सामना 25 षटकांचाच खेळवण्यात आला. भारताने अफगाणिस्तानला 24.5 ओव्हरमध्ये 194 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर भारताने 22.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून विजयी आव्हान पूर्ण केलं. त्यामुळे आता अफगाणिस्तान पहिल्या पराभवानंतर पलटवार करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले