
इंदूर | टीम इंडियाने मोहालीतील पहिला एकदिवसीय सामना जिंकून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. त्यानुसार टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 400 धावांचं तगडं आव्हान दिलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया बॅटिंगसाठी मैदानात आली. प्रसिध कृष्णा याने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्याच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. प्रसिधने मॅथ्यू शॉर्ट आणि कॅप्टन स्टीव्हन स्मिथ या दोघांना सलग आऊट केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 9 धावांवर 2 विकेट्स अशी स्थिती झाली.
मात्र त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 9 ओव्हरमध्ये 2 बाद 56 असा स्कोअर झाला. मात्र त्यानंतर सामन्यात पावसाने पुन्हा खोडा घातला. नाईलाजाने खेळ थांबवावा लागला.
एका बाजूला खेळ सुरु होता. तर दुसऱ्या बाजूला सामन्यादरम्यान अचानक पावसाचा झपाटा आला. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही फलंदाज आणि टीम इंडियाच्या 11 खेळाडूंनी पावसामुळे मैदानाबाहेर धाव घेतली. तर ग्राउंड स्टाफने कव्हरसह मैदानात धाव घेतली. ग्राउंड स्टाफने संपूर्ण मैदान कव्हरने झाकलं. मात्र वारंवार पावसामुळे खेळ थांबत असल्याने क्रिकेट चाहत्यांची निराशा झालीय. त्यामुळे आता खेळाला पुन्हा केव्हा सुरुवात होणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पावसामुळे सामन्याचा खेळखंडोबा
There’s a bout of rain in Indore as the play stops.
Australia 56/2 after 9 overs.
Scorecard – https://t.co/XiqGsyElAr…… #INDvAUS @IDFCFIRSTBank pic.twitter.com/LVTvXs9iik
— BCCI (@BCCI) September 24, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन-विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.