
इंदूर | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा मध्यप्रदेश राज्यातील इंदूरमध्ये खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात आली. ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट लवकर मिळवली. मोहालीतील पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड याला जोश हेझलवूड याने 8 धावांवर बाद केलं. ऋतुराजनंतर श्रेयस अय्यर मैदानात आला.
त्यानंतर अय्यर आणि शुबमन गिल या दोघांनी पावर प्लेमध्ये जोरदार फटकेबाजी करत चांगला फायदा घेतला. श्रेयस पहिल्या सामन्यात रनआऊट झाला होता. मात्र या सामन्यात श्रेयसने दे दणादण फटके मारले. तर दुसऱ्या बाजूने शुबमनही फटकेबाजी करत होता. सामना रंगला असताना ऐन वेळेस 10 व्या ओव्हरमध्ये पावसाने एन्ट्री घेतली. दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अखेर पावसामुळे खेळ थांबवावा लागला.
ऋतुराज गायकवाड 8 धावांवर बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 3.4 ओव्हरमध्ये 1 बाद 16 असा झाला. त्यानंतर श्रेयस आणि गिल या दोघांनी 9.4 ओव्हरपर्यंत 63 धावांची वेगवान नाबाद भागीदारी केली. मात्र त्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खेळ थांबला. त्यामुळे शुबमन 32 आणि श्रेयस 34 धावांवर नाबाद परतले. पाऊस जोरात सुरु झाल्याने ग्राउंड स्टाफने झटपट कव्हर घेत मैदानात धाव घेतली. ग्राउंड स्टाफने संपूर्ण मैदान कव्हरने झाकलं. आता क्रिकेट चाहते सर्वच सामना पुन्हा सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
जा रे जा रे पावसा
🚨:Rain stopped play in Indore#TeamIndia #INDvsAUS #INDvAUS #IndvsAus2023pic.twitter.com/aj5I4FlGKY
— The cricket commune (@cricketcommune) September 24, 2023
दरम्यान मोहालीतील पहिल्या सामन्यातही पावसाने हजेरी लावली होती. तेव्हा दुपारी 4 वाजून 5 मिनिटांनी खेळ थांबवला होता. मात्र 15 मिनिटांच्या व्यत्ययानंतर 4 वाजून 20 मिनिटांनी पुन्हा खेळाला सुरुवात झाली.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन-विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.