Ind vs Aus: Jasprit Bumrah चा मिसाइल यॉर्कर, फिंच काहीच करु शकला नाही, पहा VIDEO

Ind vs Aus: फिंच फक्त पाहत राहिला, तेवढ्यात खेळ खल्लास झाला होता.

Ind vs Aus: Jasprit Bumrah चा मिसाइल यॉर्कर, फिंच काहीच करु शकला नाही, पहा VIDEO
jasprit bumrah
Image Credit source: VideoGrab
| Updated on: Sep 24, 2022 | 11:03 AM

मुंबई: दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळला नाही. मोहालीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यातही तो दिसला नाही. काल नागपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात मात्र त्याला संधी मिळाली. या मॅचमध्ये त्याने धोकादायक ठरणाऱ्या ऑस्ट्रेलियन कॅप्टन एरॉन फिंचला पॅव्हेलियनमध्ये धाडलं. फिंच त्यावेळी 15 चेंडूत 31 धावांवर खेळत होता. त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला.

क्षणार्धात एरॉन फिंचचा खेळ संपवला

जसप्रीत बुमराह अचूक यॉर्कर चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो. काल त्याच्या याच चेंडूने टीम इंडियाला आवश्यक असलेलं यश मिळवून दिलं. बुमराहच्या यॉर्करने क्षणार्धात एरॉन फिंचचा खेळ संपवला. फिंचला त्या चेंडूवर फार काही हालचाल करताच आली नाही. चेंडूने थेट स्टम्पसचा वेध घेतला.

त्याच्यावरच विश्वास सार्थ ठरवला

फिंच ऑस्ट्रेलियासाठी मोठी धावसंख्या उभारु शकला असता. त्यामुळे त्याला आऊट करणं आवश्यक होतं. फिंच चांगली फलंदाजी करत होता. त्याला सूर सापडला होता. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्माने विश्वासू जसप्रीत बुमराहच्या हाती चेंडू सोपवला. त्याने देखील त्याच्यावरच विश्वास सार्थ ठरवला.

फिंचला अंदाजच आला नाही

ऑस्ट्रेलियन इनिंगच्या 5 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर बुमराहने अचूक यॉर्करने फिंचला बोल्ड केलं. हा यॉर्कर इतका कमालीचा होता की, फिंचला त्याचा अंदाजच आला नाही.

पावसामुळे दुसरा टी 20 सामना 8 ओव्हरचा खेळवण्यात आला. बुमराहने दोन ओव्हर बॉलिंग केली. त्याने 23 धावा देऊन फिंचची विकेट काढली. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने 8 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 90 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 4 विकेट गमावून 7.2 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठलं.