Rohit Sharma : कुलदीप यादन याने कडक बॉलिंग केली पण इथे खाल्ली माती, रोहित शर्मा प्रचंड भडकला

| Updated on: Mar 22, 2023 | 6:48 PM

भारताचा कर्णधार रोहित शर्मा फिरकीपटू कुलदीप यादव याच्यावर भयंकर भडकलेला दिसून आला. कुलदीप यादवने तर सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केलीये तरीही असं काय झालं की रोहित इतका भडकला.

Rohit Sharma : कुलदीप यादन याने कडक बॉलिंग केली पण इथे खाल्ली माती, रोहित शर्मा प्रचंड भडकला
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा फिरकीपटू कुलदीप यादव याच्यावर भयंकर भडकलेला दिसून आला. कुलदीप यादवने तर सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली, त्याने कांगारूंची मधली फळी उद्ध्वस्त केली होती. 1 ओव्हर मेडन आणि 3 महत्त्वाच्या विकेट्स घेऊनही रोहित त्याच्यावर इतका कोणत्या कारणामुळे भडकला होता? असा सवाल सर्व चाहत्यांना पडला आहे.

नेमकं काय झालं?
ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना कुलदीप 39 वी ओव्हर टाकत होता. आधीच्याच ओव्हरमध्ये त्याने कॅरीला अप्रतिम बॉलवर क्लीन बोल्ड केलं होतं. या ओव्हरमधील शेवटचा चेंडू स्ट्राईकवर असलेल्या अॅस्टन अगरच्या पॅडला लागला त्यावेळी अपील केल्यावर अंपायरने नाबाद दिलं.

 

अंपायरने नाबाद सांगितल्यावरही कुलदीप यादव डीआरएस घेण्यासाठी उत्सुक होता. रोहितने राहुलला विचारलं त्यावर त्यानेही सकारात्मक काही प्रतिसाद दिला नव्हता मात्र कुलदीपने त्याचा हट्ट काही सोडला नाही. अखेर राहुल निघून गेला मात्र कुलदीपन तरीही डीआरएस घेण्याचा आपला आग्रह कायम ठेवला. शेवटी रोहितनेही डीआरएस घेतलाच.

तिसऱ्या पंचांनी पाहिलं तर त्यामध्ये चेंड विकेटच्या बाहेर जात असल्याचं स्पष्ट झालं. डीआरएस वाया गेला पण त्यानंतर रोहित आक्रमक झाला. लाईव्ह मॅचमध्येच त्याने कुलदीपला झाडलं त्यावेळी जडेजा आणि विराट दोघेही तिथे उभे असलेले दिसून आले. कुलदीपने इतकी चांगली बॉलिंग केली मात्र एकाच चुकीच्या हट्टापायी सगळी माती झाली.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.