एकाच दिवसात 2 खेळाडूंचा रामराम, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनंतर आता ‘या’ क्रिकेटरचा अलविदा

| Updated on: Feb 07, 2023 | 8:30 PM

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाजाने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर आता आणखी एकाने क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

एकाच दिवसात 2 खेळाडूंचा रामराम, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनंतर आता या क्रिकेटरचा अलविदा
Follow us on

इस्लामाबाद : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहेत. या टेस्ट सीरिजला येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी क्रिकेट विश्वात मोठी घडामोड घडली आहे. या कसोटी मालिकेआधी आज (7 फेब्रुवारी) 2 दिग्गज खेळाडूंनी क्रिकेट विश्वाला रामराम केला आहे. या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या दोन्ही क्रिकेटपटूंच्या निवृत्तीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

ऑस्ट्रेलिया टी 20 क्रिकेट टीमचा कर्णधार एरॉन फिंच याने क्रिकेट विश्वाला रामराम ठोकला. तर दुसऱ्या बाजूला काही तासांमध्येच पाकिस्तानचा माजी विकेटकीपर बॅट्समन कामरान अकमल यानेही निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे कामरान यापुढे क्रिकेटच्या कोणत्याच प्रकारात खेळताना दिसणार नाही. कामरानचा गेल्या आठवड्यातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या निवड समितीत समावेश करण्यात आला होता.

कामरान पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या तयारीत बिजी आहे. कामरानने या गडबडीत निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याने याबाबत पत्रकारांना माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

कामरान काय म्हणाला?

“देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नाही, तर लीग क्रिकेटही खेळायला नको, ज्यामुळे लायक खेळाडूला संधी मिळेल”, असं कामरान म्हणाला. तसेच मी आता सेलेक्टर आणि मेंटॉरही झालोय. तर हो, मी आता निवृत्ती घेतोय”, असंही कामरान याने स्पष्ट केलं.

कामरानने 250 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र कामरानला 2017 नंतर टीममध्ये पुन्हा संधी मिळाली नाही. त्यानंतर कामरान गेल्या वर्षी पाकिस्तान सुपल लीगमध्ये खेळला होता. मात्र यंदा कामरानची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे कामरानसमोर मोठा प्लॅटफॉर्म शिल्लक राहिला नाही.

कामरानची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

विकेटकीपर बॅट्समन कामरान याने 2002 मध्ये पाकिस्तानसाठी वनडे आणि कसोटी पदार्पण केलं. कामरानने आपली कामगिरी दाखवत संघातील स्थान त्याने कायम केलं. कामरानकडून विकेटकीपिंग दरम्यान अनेकदा कॅच आणि स्टंपिंगच्या संधी हुकल्या. त्यासाठी त्याच्यावर टीका झाली. मात्र त्याने पाकिस्तानसाठी बॅटिंगने चांगली कामगिरी केली.

कामरानने 53 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार 648 धावा, 157 वनडे मॅचमध्ये 3 हजार 236 धावा तर 56 टी 20 सामन्यांमध्ये 987 रन्स केल्या. तसेच तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने स्टंपमागे 369 कॅच आणि 85 स्टिंपग आऊट केलं.