
अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 महाअंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाने पहिले बॅटिंग करत ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडिया या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच ऑलआऊट झाली. टीम इंडियाचे खेळाडू ठराविक अंतराने आऊट झाले. फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागला. टीम इंडियाकडून केएल राहुल याने सर्वाधिक 66 आणि विराट कोहली याने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली.
विराटने या 13 व्या आणि वैयक्तिक चौथ्या वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केली. टीम इंडियाच्या सलग 10 विजयांमध्ये विराटने निर्णायक भूमिका बजावली. विराटने काही सामन्यांमध्ये गेमचेंजिग भूमिका बजावली. तसेच साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना 85 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावरच टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता. विराटने या वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण किती धावा केल्यात आणि काय काय रेकॉर्ड केलेत जाणून घेऊयात.
विराटने सेमी फायनल आणि फायनलसह वर्ल्ड कपमधील एकूण 11 सामन्यांमध्ये 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या. यामध्ये विराटने शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावली. विराटची या वर्ल्ड कपमधील 117 ही सर्वोत्तम खेळी ठरली. विराटने ही शतकी खेळी न्यूझीलंड विरुद्ध सेमी फायनलमध्ये केली होती.
विराट एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तसेच विराट सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा बहुमान मिळवला. तसेच विराटने 2019 नंतर यंदा 2023 मध्ये सलग 5 वेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली. तसेच विराटने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध शतक केलं. विराटचं हे वनडे करिअरमधील 50 वं शतक ठरलं. विराटने यासह सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक 49 एकदिवसीय शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.
दरम्यान विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात 3 धावा करताच माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याचा विक्रम मोडीत काढला. विराट एकदिवसीय वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. तर रिकी पॉन्टिंगची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. इतकंच नाही, तर विराटने वर्ल्ड कपमध्ये एकमेव विकेटही घेतली. विराटने वर्ल्ड कप 2023 मधील शेवटच्या साखली सामन्यात नेदरलँड्स कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याला आऊट केलं.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.