IND vs AUS : केएल राहुल तू पण! अशी संधी सोडणं म्हणजे सामना गमावण्यासारखंच, काय केलं पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी केलेल्या चुका चांगल्याच महागात पडणार आहे. गचाळ क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्याची काही संधी सोडली. काय केलं ते पाहा व्हिडीओ

IND vs AUS : केएल राहुल तू पण! अशी संधी सोडणं म्हणजे सामना गमावण्यासारखंच, काय केलं पाहा Video
IND vs AUS : ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्याची आणखी एक संधी गमावली, केएल राहुल याच्याकडून मोठी चूक Watch VideoImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 4:47 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिला वनडे सामना सुरु आहे. पाटा विकेट असल्याने भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात विकेट घेत ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सपाट खेळपट्टीमुळे गोलंदाजांना गोलंदाजी करणं कठीण आहे. अशा स्थितीत चांगलं क्षेत्ररक्षण गरजेचं आहे. एक चूक संघाला महागात पडू शकते. डेविड वॉर्नरच्या बाबतीत तसंच काहीसं घडलं. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने वॉर्नरचा झेल सोडला. तेव्हा तो 14 धावांवर होता. मग काय संधीचं सोनं करत वॉर्नरने अर्धशतक झळकावलं. अशीच चूक मार्नस लाबुशेनच्या बाबत झाली. पण यावेळी झेल नाही तर सोपा रनआऊट सोडला आणि जीवदान मिळालं.

केएल राहुल याने नेमकं काय केलं पाहा

संघाचं 23 वं षटक कर्णधार केएल राहुल याने रवींद्र जडेजाकडे सोपवलं. पहिल्या चेंडूवर लाबुशेननं कव्हरच्या दिशेने चेंडू फटकावला. पण सूर्यकुमार यादव याने उडी घेत चेंडू अडवला. दुसरीकडे, लाबुशेन अर्ध्यात धावत आला. बाद होईल अशी शक्यता वाटल्याने ग्रीनने रन घेण्यास नकार दिला. त्यामुळे लाबुशेनला माघारी जाण्यास बराच वेळ होता. सूर्यकुमार यादव याने केएल राहुलच्या दिशेने चेंडू फेकला. पण त्याला हा चेंडू पकडण्यात अपयश आलं आणि लाबुशेनला जीवदान मिळालं. यावेळी लाबुशेन 11 धावांवर खेळत होता.

ऑस्ट्रेलियाने 26 षटकांचा खेळ होईपर्यंत 3 गडी गमवून 131 धावा केल्या होत्या. मिचेल मार्श 4 धावा, डेविड वॉर्नर 52 आणि स्टीव्ह स्मिथ 41 धावा करून तंबूत परतला. तर मार्नस लाबुशेन आणि कॅमरॉन ग्रीन खेळत आहेत. भारताकडून मोहम्मद शमीने 2, तर रवींद्र जडेजाने 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांचे खेळाडू

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲडम झम्पा

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर) इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

Non Stop LIVE Update
मुंबईत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा; किंमत ऐकून बसेल धक्का
मुंबईत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा; किंमत ऐकून बसेल धक्का.
'तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मी म्हातारा झालो नाही...',महायुतीला इशारा
'तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मी म्हातारा झालो नाही...',महायुतीला इशारा.
'लाडक्या बहिणी'ना दम देणं महाडिकांना भोवणार? आयोगानं घेतला मोठा निर्णय
'लाडक्या बहिणी'ना दम देणं महाडिकांना भोवणार? आयोगानं घेतला मोठा निर्णय.
'भाजपवाल्यानो... आता पहिले तुमचीच मस्ती जिरवतो', जानकरांना संताप अनावर
'भाजपवाल्यानो... आता पहिले तुमचीच मस्ती जिरवतो', जानकरांना संताप अनावर.
भाजपच्या जाहीरनाम्यात 'लाडक्या बहिणीं'सह शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
भाजपच्या जाहीरनाम्यात 'लाडक्या बहिणीं'सह शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा.
'मविआ'चा महाराष्ट्रनामा, जाहीरनाम्यात 'या' पंचसूत्रीसह कोणत्या घोषणा
'मविआ'चा महाराष्ट्रनामा, जाहीरनाम्यात 'या' पंचसूत्रीसह कोणत्या घोषणा.
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी.
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल.
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा.
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?.