IND vs AUS : श्रेयस अय्यर रन आऊट झाला तेव्हा नेमकी चूक कोणाची? रैना आणि मिश्रा यांनी स्पष्टच सांगितलं..

IND vs AUS : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या दृष्टीकोनातून श्रेयस अय्यरकडे पाहिलं जात आहे. मधल्या फळीत चांगली फलंदाजी करेल या हेतूने त्याचं कमबॅक झालं आहे. पण त्याला अजूनही स्वत:ला सिद्ध करता आलेलं नाही.

IND vs AUS : श्रेयस अय्यर रन आऊट झाला तेव्हा नेमकी चूक कोणाची? रैना आणि मिश्रा यांनी स्पष्टच सांगितलं..
IND vs AUS : श्रेयस अय्यर कोणाच्या चुकीमुळे रन आऊट झाला? रैना आणि मिश्रा म्हणाले...
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 22, 2023 | 10:10 PM

मुंबई : भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या वनडे सामन्यात 5 गडी राखून पराभूत केलं. टॉस जिंकल्यानंतर कर्णधार केएल राहुल याने गोलंदाजीचा निर्णय घेतला.तसेच ऑस्ट्रेलियाला 276 धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. भारताने हे आव्हान 48.4 षटकात पाच गडी गमवून पूर्ण केलं. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरकडून अपेक्षा होत्या. मात्र रनआऊट झाल्याने त्याला या सामन्यातही सिद्ध करता आलं नाही. श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांच्यात एका धावेसाठी गडबड झाली आणि श्रेयसला तंबूत जावं लागलं. पण यावेळी नेमकी चूक कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

श्रेयस अय्यर रन आऊट झाला, चूक कोणाची?

शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 142 धावांची भागीदारी केली. जोखिम घेत फटका मारताना ऋतुराज बाद होत तंबूत परतला. त्यानंतर मैदानात श्रेयर अय्यर आला. त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र 25 व्या षटकात एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू मारला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न फसला.

नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या शुबमन गिलनेही क्रीज सोडली. पण अर्ध्या रस्त्यात असताना त्याने अय्यरला मागे परतण्यास सांगितलं. पण तिथपर्यंत खूपच उशीर झाला होता. कॅमरोन ग्रीनने विकेटकीपरकडे थ्रो केला आणि अय्यर धावचीत झाला. बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर प्रचंड नाराज दिसला. त्यामुळे नेमकी कोणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सामन्याचं समालोचन करत असलेले अमित मिश्रा आणि सुरेश रैना यांना याबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा दोघांनी सांगितलं की, श्रेयस अय्यरने जोखिम घ्यायला नको होती. मिश्राने सांगितलं की, श्रेयस अय्यर चेंडू मारताच धावू लागला, त्यामुळे गिलला हा की नको सांगण्याची संधीच मिळाली नाही. रैनाने देखील त्याला समर्थन देत सांगितलं की, “रिस्की धाव घेण्याची गरज नव्हती. नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या गिलसोबत संवाद साधणही तितकंच महत्त्वाचं होतं.”