AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : ‘तुम्ही एसीत बसता आणि मी…’, मोहम्मद शमीने समालोचकाला दिलं तोडीस तोड उत्तर

IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात मोहम्मद शमीचा कहर पाहायला मिळाला. 51 धावा देत 5 जणांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर समालोचकांशी बोलताना दिलखुलासपणे आपलं म्हणणं मांडलं.

IND vs AUS : 'तुम्ही एसीत बसता आणि मी...', मोहम्मद शमीने समालोचकाला दिलं तोडीस तोड उत्तर
IND vs AUS : मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या डावानंतर हाणला समालोचकाला टोला, म्हणाला "तुम्ही एसीत बसता आणि.."
| Updated on: Sep 22, 2023 | 9:25 PM
Share

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत केएल राहुल याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. तसेच ऑस्ट्रेलियाला 276 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. पाटा विकेटवर पाच गडी बाद करणं ही मोठी बाब आहे. पीसीए स्टेडियमध्ये करिअरमधील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत 51 धावा देत 5 गडी बाद केले. मोहम्मद शमीने दुसऱ्यांदा वनडेत पाच गडी बाद केले आहे. दुसरीकडे, भारत विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे मोहम्मद शमीचं मोठं योगदान आहे असंच म्हणावं लागेल. सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीनंतर समालोकांनी लगेचच त्याला पकडलं आणि प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी शमीने दिलखुलास अंदाजात उत्तरं दिली.

काय म्हणाला मोहम्मद शमी?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच गडी बाद केल्यानंतर त्याला सिराजच्या स्पेलची आठवण करून दिली. शमी उत्तर देताना म्हणाला की, ‘आम्ही एकमेकांच्या यशाचा आनंद लुटतो. आम्ही मागचं एक वर्ष एकत्र घालवलं आहे आणि हा त्याचाच परिणाम आहे. आम्ही नव्या चेंडूने गोलंदाजी करतो. आपल्यावर लाईन लेंथ आणि वेग कायम ठेवण्याची जबाबदारी असते. आज मी तसंच केलं.’

मोहालीत प्रचंड उकाडा असल्याचं दिसून आलं. खेळाडूंच्या घामांच्या धारांवरून हा अंदाज येईल. शमी आणि बुमराह यांना चार षटकं टाकल्यानंतर आराम दिला गेला. पहिला स्पेल संपल्यानंतर ते मैदानाबाहेर गेले. त्यानंतर मैदानात आल्यानंतर शमीने जबरदस्त गोलंदाजी केली. डेथ ओव्हरमध्ये स्लोवर आर्म टाकत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणलं. तेव्हा समालोचकाने उकाड्याबाबत प्रश्न विचारला.

“तुम्ही लोकं एसीमध्ये होतात. मी बाहेर गरमीत खेळत होतो. फास्ट बॉलर विकेट पेक्षा जास्त काहीच काढू शकत नव्हते. म्हणून स्लोअर आर्म पर्याय निवडला. हा रणनिती योग्य ठरली त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. संघाला याची गरज होती.”, असं मोहम्मद शमी याने सांगितलं. मोहम्मद शमी भारताकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कपिल देव याने केली आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.