IND vs BAN : यशस्वी जयस्वाल याचा अफलातून झेल, बुमराहकडून कौतुक,पाहा Video

Yashasvi Jaiswal Catch : टीम इंडिया आणि बांगलादेशमधील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. बांगलादेश दुसऱ्यांदा बॅटींगला उतरली आहे. डोंगराएवढा लक्ष्याचा पाठलाग करताना सुरूवात चांगली केली होती. मात्र यशस्वी जयस्वालने कमाल कॅच घेत सामना फिरवला.

IND vs BAN : यशस्वी जयस्वाल याचा अफलातून झेल, बुमराहकडून कौतुक,पाहा Video
| Updated on: Sep 21, 2024 | 4:26 PM

टीम इंडिया आणि बांगलदेशमधील पहिल्या कसोटी सामना सुरु आहे. तिसरा दिवस सुरू असून टीम इंडिया आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडियाने दुसऱ्या डाव 247-4 घोषित करण्यात आला. रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी शतके केलीत. बांगलादेशचा दुसरा डाव सुरू असून चार विकेट गेल्या आहेत. जसप्रीत बुमराहने पहिली विकेट घेतली त्यानंतर आर अश्विन याने तीन विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने झाकीर हसनला आऊट केलं, यशस्वी जयस्वाल याने अफलातून कॅच घेतला. सोशल मीडियावर कॅचचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

टीम इंडियाने दुसरा डाव घोषित केल्यावर 515 धावांचे लक्ष्य ठेवून बॅटींगसाठी बांगलादेशच्या सलामीवीर मैदानात उतरले होते. शादमान इस्लाम आणि झाकीर हसन यांनी चांगली सुरूवात केली होती. पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. बुमराहच्या गोलंदाजीवर 17 व्या ओव्हरमध्ये झाकीर हसनला सेट अप लावून आऊट केले. यशस्वी जयस्वालने डावीकडे डायव्हिंग करत उत्कृष्ट कॅच पकडला. बुमराहनेही त्याचे कॅच घेतल्यावर कौतक केले.

 

दरम्यान, दुसऱ्या डावामध्ये पंतने 13 चौकार आणि 4 षटकारांसह 109 धावा केल्या. तर गिलनेही 176 चेंडूत 119 धावा 10 चौकारांसह 4 सिक्सर मारले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 217 चेंडूत 167 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाकडून कसोटीमध्य कीपर म्हणून सर्वाधिक शतकांच्या महेंद्र सिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.