IND vs BAN: बांग्लादेशवर संकट, भारताविरुद्धच्या सामन्याआधी प्रमुख गोलंदाज बाहेर

IND vs BAN: टीम इंडिया विरुद्ध या गोलंदाजाची कामगिरी कशी आहे?

IND vs BAN: बांग्लादेशवर संकट, भारताविरुद्धच्या सामन्याआधी प्रमुख गोलंदाज बाहेर
Bangladesh player
Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Dec 01, 2022 | 5:15 PM

ढाका: भारत आणि बांग्लादेशमध्ये वनडे सीरीज सुरु होण्याआधी यजमान संघाला झटका बसला आहे. बांग्लादेशचा स्टार गोलंदाज तस्कीन अहमदला दुखापत झालीय. त्यामुळे बांग्लादेशच्या टीमला मोठा फटका बसला आहे. जुन्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा उचलल खालल्याने तस्कीन पहिल्या वनडेला मुकणार आहे. तस्कीनचा भारताविरुद्ध वनडे रेकॉर्ड शानदार आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्येही तो चांगल्या फॉर्ममध्ये होता.

निवड समिती सदस्याने काय सांगितलं?

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या मुख्य निवडकर्त्याने सांगितलं की, “तस्कीनच्या जुन्या पाठिच्या दुखण्याने उचल खाल्लीय. त्यामुळे तो कमीत कमी एक वनडे मॅचमध्ये खेळणार नाही” उर्वरित दोन सामन्यात तो खेळणार की, नाही, ते दुखापतीची स्थिती पाहून ठरवलं जाईल, क्रिकबजने हे वृत्त दिलं आहे.

शोरीफुलला मिळालं स्थान

बांग्लादेश निवडकर्त्यांनी तस्कीनचा बॅकअप म्हणून शोरीफुल इस्लामचा टीममध्ये समावेश केलाय. बांग्लादेशकडे मुस्तफिजुर रहमान, इबादत हौसेन आणि हसन महमूद हे मध्यमगती गोलंदाज आहेत. तस्कीनची उणीव बांग्लादेशला मोठ्या प्रमाणात जाणवेल. तस्कीन वेगाबरोबर चेंडू चांगला स्विंग करु शकतो. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याने कमालीची गोलंदाजी केली होती.

भारताविरुद्ध चांगला रेकॉर्ड

भारताविरुद्ध तस्कीनचा रेकॉर्ड चांगला आहे. भारताविरुद्ध तस्कीनने 6 वनडे सामन्यात 12 विकेट घेतल्यात. 2014 साली पहिल्या वनडेत त्याने 5 विकेट घेतल्यात. शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये 15 वनडे सामन्यात तस्कीनने 26 विकेट घेतल्यात. वनडे सीरीजचे तीन सामने या मैदानात होणार आहेत. त्यामुळे बांग्लादेशला त्याची उणीव जाणवेल.