IND vs ENG :’त्या’ कृतीसाठी जसप्रीत बुमराह दोषी, आयसीसीने घेतली ओली पोपची बाजू

| Updated on: Jan 29, 2024 | 3:51 PM

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला 28 धावांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे पहिल्याच कसोटी सामन्यात रोहित सेनेची हवा निघून गेली आहे. भारतीय क्रीडाप्रेमींना या कसोटी मालिकेतून बऱ्याच अपेक्षा होत्या. होम ग्राउंडचं फायदा घेत विजय मिळवेल अशी अपेक्षा होती. पण ओली पोपने सर्व काही धुळीस मिळवलं. तसेच वेगवान गोलंदाजाला ओली पोपसोबत एक कृती करणं चांगलंच महागात पडलं आहे.

IND vs ENG :त्या कृतीसाठी जसप्रीत बुमराह दोषी, आयसीसीने घेतली ओली पोपची बाजू
ओली पोपसोबत तसं करणं भारतीय जसप्रीत बुमराहला पडलं महागात, आयसीसीने उगारला कारवाईचा बडगा
Follow us on

मुंबई : पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात चौथ्या दिवशी भारतावर विजय मिळवला आहे. त्यामुळे व्हाईट वॉश सोडा मालिकेत कमबॅक करण्याचं मोठं आव्हान आता टीम इंडियासमोर आहे. इंग्लंडला भारतीय मैदानात कमी लेखनं टीम इंडियाला महागात पडलं आहे. पहिल्या दोन कसोटीसाठी निवडलेला संघ पहिल्याच सामन्यात कुचकामी ठरल्याचं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ओली पोप ठरला. दुसऱ्या डावात त्याने भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. भारताने घेतली आघाडी मोडून काढण्यात त्याचा वाटा आहे. ओली पोपने एकट्याने 278 चेंडूंचा सामना केला. तसेच 21 चौकारांच्या मदतीने 196 धावा केल्या. त्याला बाद करण्यात बुमराहला यश आलं खरं तिथपर्यंत इंग्लंडने मोठी मजल मारली होती. तिसऱ्या स्थानावर उतरलेल्या ओली पोपला बाद करण्यासाठी सहा विकेट्सची वाट पाहावी लागली. सर्वात शेवटी त्याला बाद करण्यात बुमराहला यश आलं. पण तत्पूर्वी बुमराह त्याला बाद करण्यासाठी डिवचलं होतं. त्याचा फटका त्याला सामन्यानंतर बसला आहे. आयसीसीने त्याला दोषी ठरवलं असून बुमराहनेही गुन्हा कबुल केला आहे.

दुसऱ्या डावाच्या 81 व्या षटकात सदर प्रकार घडला आहे. ओली पोप धाव घेत असताना त्याच्या मार्गात अडथळा टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे ओली आणि बुमराह यांचा एकमेकांना धक्का लागला. त्यामुळे आयसीसी आचारसंहिता 2.12 चे उल्लंघन केल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये खेळाडू, खेळाडू सपोर्ट कर्मचारी, पंच, मॅच रेफरी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी ( आंतरराष्ट्रीय सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक) गैरवर्तन केलं तर कारवाईस पात्र ठरतो. यात जसप्रीत बुमराह दोषी आढळून आला आहे.

24 महिन्यानंतर बुमराह अशाप्रकारे दोषी असल्याचं आढळून आलं आहे. 1 डेमेरिट पॉइंट त्याच्या रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला आहे. मैदानातील पंच पॉल रिफेल-ख्रिस गॅफनी, थर्ड अम्पायर मराइस इरास्मस आणि चौथा पंच रोहन पंडित यांनी या गुन्ह्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. लेव्हल 1 च्या उल्लंघन केल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे बुमराहच्या मॅच फीमधून 50 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. तसेच 1 किंवा 2 डेमेरिट पॉइंट देण्यात आले आहेत. बुमराहनेही आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यामुळे याची पुढील सुनावणी होणार नाही.

बुमराहने दुसऱ्या डावात 16.1 षटकं टाकली. यात 4 निर्धाव षटकं टाकली. सचे 41 धावा देत 4 गडी बाद केले. तर पहिल्या डावात 8.3 षटक टाकली आणि 1 निर्धाव षटक टाकलं. यात 28 धावा देत 2 गडी बाद केले.