IND vs ENG : रोहितची झंझावाती शतकी खेळी, सचिनचे 2 महारेकॉर्ड ब्रेक, कटकमध्ये हिटमॅनचा धमाका

Rohit Sharma Broke Sachin Tendulkar Record : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कटकमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी केली. रोहितने यासह सचिनला पछाडत 2 रेकॉर्ड ब्रेक केले.

IND vs ENG : रोहितची झंझावाती शतकी खेळी, सचिनचे 2 महारेकॉर्ड ब्रेक, कटकमध्ये हिटमॅनचा धमाका
rohit sharma ind vs eng 2nd odi
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 10, 2025 | 8:04 AM

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रविवारी 9 फेब्रुवारीला 76 चेंडूत स्फोटक शतक करत इतिहास घडवला. रोहितच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 32 वं शतक ठरलं. रोहितने 132.22 च्या स्ट्राईक रेटने 90 बॉलमध्ये 119 रन्स केल्या. रोहितच्या या स्फोटक खेळीत 7 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता. रोहितच्या या शतकी खेळीमुळे टीम इंडियाला विजयासाठी मिळालेलं 305 धावांचं आव्हान सहज पूर्ण करता आलं. टीम इंडियाने 44.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 308 धावा केल्या. तसेच रोहितने या शतकी खेळीसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे 2 महारेकॉर्ड ब्रेक केले.

रोहितने वयाच्या 30 वर्षांनंतर कटकमध्ये केलेलं कारकीर्दीतील 36 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. यासह 37 वर्षीय रोहित वयाच्या 30 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला. रोहितने याबाबतीत सचिन तेंडुलकरचा मागे टाकलं. याआधी सचिनने 30 व्या वर्षी 35 शतकं केली होती.

तिशीनंतर सर्वाधिक शतकं करणारे भारतीय

रोहित शर्मा : 36
सचिन तेंडुलकर : 35
राहुल द्रविड : 26
विराट कोहली : 18

सचिनला मागे टाकत रोहितचा धमाका

रोहितने शतकी खेळीसह आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा ओपनर ठरला. रोहितने याबाबत सचिनला मागे टाकलं आहे. रोहित या सामन्याआधी 15 हजार 285 धावांसह दुसऱ्या स्थानी होता. मात्र शतकी खेळीनंतर रोहितच्या नावावर आता ओपनर म्हणून 15 हजार 404 धावा झाल्या आहेत. तर सचिनने ओपनिंगला येत 15 हजार 335 धावा केल्या. तर टीम इंडियासाठी ओपनर म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय 15 हजार 758 धावांचा विक्रम हा वीरेंद्र सेगहवाग याच्या नावावर आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अ‍ॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड आणि साकिब महमूद.