IND vs ENG : “रोहित गेल्या काही…” जोस बटलरने पराभवानंतर हिटमॅनचं नाव घेत काय म्हटलं?
Jos Buttler on Rohit Sharma IND vs ENG 2nd Odi : टीम इंडियाने इंग्लंडवर सलग दुसरा विजय मिळवत एकदिवसीय मालिका जिंकली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने शतकी खेळी करत विजय सोपा केला. रोहितच्या या खेळीबाबत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर काय म्हणाला? जाणून घ्या.

टीम इंडियाने रविवारी 9 फेब्रुवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 305 धावांचं आव्हान हे टीम इंडियाने 44.5 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने 308 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रोहितला गेल्या अनेक महिन्यांपासून धावांसाठी झगडावं लागत होतं. मात्र रोहितला अखेर सूर गवसला आणि त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली.
रोहितने एकदिवसीय क्रिकेटमधील 32 वं शतक झळकावलं आणि टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. रोहितने 90 बॉलमध्ये 119 रन्स केल्या. टीम इंडियाने रोहितच्या शतकी खेळीच्या जोरावर सामन्यासह मालिकाही जिंकली. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. सलग 2 सामने गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने रोहितचं नाव घेत काय म्हटलं? जाणून घेऊयात.
जोस बटलर काय म्हणाला?
“आम्ही अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीने केल्या असं मला वाटतं. आम्ही बॅटिंग करताना चांगल्या स्थितीत होतो. आम्हाला अशा फलंदाजाची गरज होती जो आम्हाला 350 धावांपर्यंत पोहचवू शकेल”, असं म्हणत बटलरने तिथपर्यंत न पोहचल्याबद्दल खंत बोलून दाखवली.
बटलर रोहित शर्मा याच्याबाबत काय म्हणाला?
“बटलरने रोहितच्या शतकी खेळीचं कौतुक करत त्याला श्रेय दिलं. रोहितला श्रेय जातं, त्याने चांगली बॅटिंग केली. रोहित गेल्या काही वर्षांपासून वनडे क्रिकेटमध्ये अशाच प्रकारे बॅटिंग करत आहे. रोहित धावा करु इच्छित होता. त्याने वेगाने धावा केल्या. तसेच प्रतिस्पर्धी संघाने चांगला खेळ केला”, असंही बटलरने नमूद केलं.
बटलरकडून रोहितला श्रेय
“We got into some nice positions with the bat”
Jos Buttler is looking at the positives again, despite another defeat 🏴
📺 Watch #INDvENG on @tntsports & @discoveryplusUK pic.twitter.com/GnKJrZ61bJ
— Cricket on TNT Sports (@cricketontnt) February 9, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड आणि साकिब महमूद.
