
भारताने दुसर्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या डावातील दव फॅक्टर लक्षात घेऊन टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. एक चांगला ट्रॅक दिसत आहे, संध्याकाळी विकेट चांगली होईल अशी आशा आहे. आम्हाला मूलभूत गोष्टींवर टिकून राहायचे आहे. खरोखर खेळाची वाट पाहत आहे. क्षेत्ररक्षण ही एक गोष्ट आहे जी सर्वांना एकत्र आणते. नितीश बाहेर गेला आहे.रिंकू एक-दोन सामन्यांना मुकेल. वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांना संघात स्थान मिळालं आहे.’ इंग्लंडचा कर्णधार जोस बटरलने सांगितलं की, ‘आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. तसाच गेमप्लॅन आहे पण अधिक चांगले करू. आशा आहे की ती चांगली खेळपट्टी आणि सामना असेल. बेथेलची तब्येत बिघडली आहे त्यामुळे जेमी स्मिथ आत आला आहे. ऍटकिन्सनऐवजी कार्सला संधी मिळाली आहे.’
पिच रिपोर्ट पाहता, हे एक मोठं ग्राउंड आहे. बाउंड्री लाईन 68m आणि 66m आणि 75m आहे. या खेळपट्टीवर काही क्रॅक आहेत आणि चांगले आच्छादन आहे. थोडंफार गवतही आहे. त्यामुळे कुठेतरी 180 च्या आसपास धावा होऊ शकतात. फिरकीसाठी खूप चांगली खेळपट्टी आहे. थोडीशी खेळपट्टी मंद होऊ शकते कारण ही काळ्या मातीची खेळपट्टी आहे. त्यामुळे भारताच्या ताफ्यात रवी बिश्नोई, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती आहेत.
भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड