AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असंही नाराजी नाट्य… नवऱ्याने बंडखोरी केली, बायको घरच सोडून माहेरी गेली; नागपुरात खळबळ

नागपूर महापालिका निवडणुकीतील राजकीय नाट्याने खळबळ उडवली आहे. पतीने भाजपविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने पत्नीने घर सोडले. पक्षाशी निष्ठावान असलेली माजी महापौर अर्चना डेहनकर आता पतीच्या विरोधात प्रचार करणार आहे. या कौटुंबिक संघर्षाने नागपुरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

असंही नाराजी नाट्य... नवऱ्याने बंडखोरी केली, बायको घरच सोडून माहेरी गेली; नागपुरात खळबळ
नागपूरमध्ये खळबळ
| Edited By: | Updated on: Jan 01, 2026 | 1:34 PM
Share

राज्यभरात महापालिका निवडणुकीची धामधूम आहे. अनेकांनी महत्प्रयासाने उमेदवारी मिळवून अर्ज भरला आहे. तर काहींचं तिकीट कापल्याने त्यांना बंडखोरी करावी लागली आहे. आता या बंडोबांना थंड करण्याचं काम सर्वच पातळीवरून होत आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यभरातच या बंडखोऱ्या झाल्या आहेत. मात्र, नागपूरमधील बंडखोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. नवऱ्याने पक्षात बंडखोरी केल्याने बायको नाराज झाली. तिने थेट नवऱ्याचं घरच सोडलं अन् माहेर गाठलं आहे. त्यामुळे नागपुरात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपमधील बंडखोरीचा थेट परिणाम माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या घरीच पाहायला मिळाला आहे. नवऱ्याने बंडखोरी केल्याने अर्चना डेहनकर घर सोडून भावाच्या घरी गेल्या आहेत. भाजपने प्रभाग 17 मधून मनोज साबळे यांना उमेदवारी दिली आहे. मनोज साबळे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. त्यामुळे भाजपने ऐनवेळी तिकीट दिले. त्यामुळे अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर हे नाराज झाले. आपल्याला तिकीट मिळेल असं त्यांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात त्यांचं तिकीट कापलं गेलं.

म्हणून घर सोडलं

तिकीट कापल्याने डेहनकर प्रचंड नाराज झाले. विनायक डेहनकर यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत थेट अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे अर्चना डेहनकर या पक्षनिष्ठा आणि पतीचा निर्णय या कात्रीत सापडल्या. त्यामुळे अर्चना डेहनकर यांनी नवऱ्याचं घर सोडायचं ठरवलं आणि घराबाहेर पडल्या. त्यांनी नागपुरातच माहेरी जाऊन भाजपचा प्रचार करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे डेहनकर आता नवऱ्याच्या विरोधातच प्रचार करताना दिसणार आहेत. 2009 ते 2012 दरम्यान भाजपमुळे महापौरपद मिळाल्याने पक्षाच्या विरोधात जाणे अर्चना डेहनकरांना अमान्य असल्यानं त्यांनी नागपुरातील भावंच घर गाठलं आहे.

दुसरी बंडखोरी, भाजपचा कस लागणार

डेहनकर यांच्या बंडखोरीची नागपुरात चर्चा असतानाच आणखी एका बंडखोरीची चर्चा रंगली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सहाय्यक आणि सघांचे एकनिष्ठ स्वयंसेवकाच्या मुलानेही बंडखोरी केली आहे. निनाद दीक्षित यांनी फॉरवर्ड ब्लॉककडून उमेदवारी अर्ज भरला आहे. निनाद दीक्षित यांनी प्रभाग 22 डी मधून फॅारवर्ड ब्लॅाकच्या तिकीटावर अर्ज भरला आहे. संघ मुख्यालयाच्या प्रभागात स्वयंसेवकाच्या बंडखोरीमुळे भाजपचा इथे कस लागणार आहे.

शेगाव गजानन महाराजांच्या मंदिरात नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांची रीघ
शेगाव गजानन महाराजांच्या मंदिरात नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांची रीघ.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी.
शिर्डी साईंच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी
शिर्डी साईंच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी.
युतीमुळे इच्छुकांचा हिरमोड, बंडोबांना थंड करण्यायुचं ठाकरेंपुढे चॅलेंज
युतीमुळे इच्छुकांचा हिरमोड, बंडोबांना थंड करण्यायुचं ठाकरेंपुढे चॅलेंज.
महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपचे 6 नगरसेवक दणक्यात बिनविरोध विजयी
महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजपचे 6 नगरसेवक दणक्यात बिनविरोध विजयी.
धंगेकरांचा भाजपविरोधात स्वबळाचा नारा तर दादांच्या NCPबद्दल काय भूमिका?
धंगेकरांचा भाजपविरोधात स्वबळाचा नारा तर दादांच्या NCPबद्दल काय भूमिका?.
18 ठिकाणी शिंदे एकटे म्हणून कॅबिनेटला दांडी? युती न झाल्यानं नाराज?
18 ठिकाणी शिंदे एकटे म्हणून कॅबिनेटला दांडी? युती न झाल्यानं नाराज?.
संभाजीनगरात रशीद मामूंना तिकीट अन् ठाकरे गटातील खैरे-दानवे भिडले
संभाजीनगरात रशीद मामूंना तिकीट अन् ठाकरे गटातील खैरे-दानवे भिडले.
उत्तर भारतीय महापौर... भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ अन्
उत्तर भारतीय महापौर... भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ अन्.
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.